Cheese Corn Sandwich sakal
फूड

Cheese Corn Sandwich Recipe : नाश्त्यासाठी झटपट चीज कॉर्न सँडविच बनवा, ही आहे रेसिपी...

चीज कॉर्न सँडविच चवीला छान आणि आरोग्यदायीही आहे. चीज कॉर्न सँडविच कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

ब्रेडपासून अनेक गोष्टी बनवल्या जातात, त्यातील एक सोपा पदार्थ म्हणजे सँडविच. चीज कॉर्न सँडविच चवीला छान आणि आरोग्यदायीही आहे. चीज कॉर्न सँडविचचे नाव ऐकताच लहान मुलांसह मोठ्यांच्या तोंडालाही पाणी सुटते. हे सँडविच चवीला अप्रतिम आहे. तुम्ही नाश्त्यात किंवा दिवसा स्नॅक म्हणून खाऊ शकता. कॉर्न आणि चीजमुळे हे सँडविचही पौष्टिक बनते. चला जाणून घेऊया चीज कॉर्न सँडविच बनवण्याची सोपी पद्धत.

चीज कॉर्न सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

6 ब्रेड स्लाइस

1 कप कॉर्न

1/2 कप चीज

चवीनुसार मीठ

1/4 टीस्पून काळी मिरी पावडर

1/4 टीस्पून चिली फ्लेक्स

1 कप बटर

चीज कॉर्न सँडविच बनवण्याची पद्धत

सर्व प्रथम एका बाऊलमध्ये चीज, कॉर्न, मीठ, काळी मिरी पावडर आणि चिली फ्लेक्स घालून मिक्स करा.

आता ब्रेडच्या स्लाइसवर बटर लावून चीज आणि कॉर्नचे मिश्रण चांगले पसरवा.

मध्यम आचेवर पॅन ठेवा आणि त्यावर बटर टाका आणि गरम करायला ठेवा.

त्यावर ब्रेड ठेवा आणि दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

चीज कॉर्न सँडविच तयार आहे. टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT