Chocolate Day 2024 esakal
फूड

Chocolate Day 2024 : ‘चॉकलेट डे’ स्पेशल करण्यासाठी घरीच बनवा चॉकलेट ब्राऊनी, एकदम सोपी आहे रेसिपी

'चॉकलेट डे' निमित्त लोक एकमेकांना विविध प्रकारचे चॉकलेट्स देतात. मात्र, तुम्ही चॉकलेटची खास रेसिपी बनवून तुमच्या प्रिय व्यक्तीचे मन जिंकू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Chocolate Day 2024 : अवघ्या काही दिवसांवर 'व्हॅलेंटाईन डे' येऊन ठेपला आहे. व्हॅलेंटाईन डे च्या आठवडाभर आधी प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. या प्रेमाच्या उत्सवामध्ये विविध प्रकारचे दिवस साजरे केले जातात. आज या व्हॅलेंटाईन वीकपैकी एक असलेला ‘चॉकलेट डे’ सर्वत्र साजरा केला जात आहे.

या चॉकलेट डे निमित्त अनेक जण एकमेकांना विविध प्रकारचे चॉकलेट्स देतात. मात्र, तुम्ही चॉकलेटची खास रेसिपी बनवून तुमच्य प्रिय व्यक्तीला प्रभावित करू शकता. आज आपण घरच्या घरी करता येणारी चॉकलेट ब्राऊनीची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

चॉकलेट ब्राऊनी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • २ मोठी अंडी

  • ४० ग्रॅम व्हाईट चॉकलेट

  • ५० ग्रॅम मैदा

  • १५० ग्रॅम डार्क चॉकलेट

  • ३० ग्रॅम मिल्क चॉकलेट

  • २५० ग्रॅम पिठीसाखर

  • १५० ग्रॅम अनसाल्टेड बटर

  • ३० ग्रॅम कोको पावडर

चॉकलेट ब्राऊनी बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी बटर आणि डार्क चॉकलेटचे बारीक तुकडे करून ते एका भांड्यात ठेवा. त्यानंतर, हे दोन्ही घटक वितळून घ्या.

  • त्यानंतर, एका बाऊलमध्ये कोको पावडर आणि मैदा चाळणीच्या मदतीने चाळून घ्या. आता व्हाईट चॉकलेट आणि मिल्क चॉकलेटचे बारीक तुकडे करा.

  • आता एका मोठ्या भांड्यात २ अंडी फेटून त्यात पीठीसाखर मिसळा. आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत चांगले मिसळून घ्या.

  • त्यानंतर, या मिश्रणात वितळलेले चॉकलेट घाला. या मिश्रणात चॉकलेट चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर, त्यात मैदा आणि कोको पावडरचे मिश्रण आणि मिल्क चॉकलेट घाला.

  • आता एका केकच्या भांड्यात किंवा ताटात हे चॉकलेटचे मिश्रण चांगले पसरवा. त्यानंतर, ओव्हनमध्ये २५ मिनिटे हे मिश्रण चांगले बेक करा. त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर याचे चौकोनी तुकडे करा. तुमची चॉकलेट ब्राऊनी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

Pune Bank News : PDCC बँकेत 'सेटलमेंट'च्या नावाखाली गंडा! दोन लाख घेतले अन् दिले बनावट नियुक्तीपत्र; बंडगार्डन पोलिसांत गुन्हा.

SCROLL FOR NEXT