Cucumber Sandwich Recipe esakal
फूड

Cucumber Sandwich Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा काकडीचे चवदार सॅंडविच, वाचा सोपी रेसिपी

Cucumber Sandwich Recipe : काकडीपासून तुम्ही सॅंडविच देखील बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Cucumber Sandwich Recipe : उन्हाळ्यात आपण जेवणात किंवा नाश्त्यात असे खाद्यपदार्थ खाण्याला प्राधान्य देतो की, जे आपल्या शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. या खाद्यपदार्थांमध्ये काकडीचा ही समावेश आहे. काकडीचे सेवन आपण अनेक प्रकारे करू शकतो. काकडीपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. सॅलड, स्मूदी, सॅंडविचमध्ये ही काकडीचा प्रामुख्याने वापर केला जातो.

विशेष म्हणजे काकडीपासून तुम्ही सॅंडविच देखील बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. काकडीपासून बनवले जाणारे हे सॅंडविच चवदार आणि पौष्टिक असून ते बनवायला अतिशय सोपे आहे. काकडीचे सॅंडविच बनवण्यासाठी फार साहित्याची गरज पडत नाही. शिवाय, सकाळच्या गडबडीत बनवण्यासाठी हे काकडीचे सॅंडविच बेस्ट आहे. चला तर मग जाणून घेऊयात काकडीच्या सॅंडविचची ही सोपी रेसिपी.

काकडीचे सॅंडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ वाटी दही

  • १ काकडी बारीक चिरलेली

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • १ गाजर बारीक चिरलेले

  • ब्रेड स्लाईस ७-८

  • पेस्टो सॉस

  • तुमच्या आवडीच्या भाज्या

  • चीझ

काकडीचे सॅंडविच बनवण्याची सोपी पद्धत :

  • सर्वात आधी ब्रेड स्लाईसच्या कडा कापून घ्या.

  • आता एका ब्रेडला दही लावून घ्या (तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता.)

  • आता त्यावर पेस्टो सॉस लावून घ्या

  • सॉस लावून झाल्यानंतर, त्यावर बारीक चिरलेली काकडी, कांदा, गाजर आणि तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही ब्रेडवर पसरवू शकता.

  • आता त्यावर चीझ घाला.

  • तुम्ही असेच सॅंडविच खाऊ शकता किंवा सॅंडविच ग्रील करून ही खाऊ शकता.

  • हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही हे काकडीचे सॅंडविच खाऊ शकता.

  • सकाळी गरमागरम चहासोबत हे काकडीचे सॅंडविच तुम्ही खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT