khajurya Esakal
फूड

Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने खजुऱ्या कशा तयार करायच्या?

घरच्याच उसाचा गुळ आणि घरच्याच वावरातील बाजरी ,घरच्याच गाईचे तूप वापरून जुण्या काळात पौष्टिक खजुऱ्या केल्या जात

सकाळ डिजिटल टीम, दिपाली सुसर

पश्चिम महाराष्ट्रात  आणि मराठवाड्यात खजुऱ्या हा गोड पदार्थ सणासुदीला आवर्जून केला जातो. बाजरी हे पिकं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

बाजरी हे धान्य खायला उबदार आणि उष्ण असल्यानं महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवाळीच्या बोचऱ्या थंडीत शरीराला उब मिळावी म्हणून दिवाळीचे फराळ करतांना मोठ्या प्रमाणात बाजरीचा उपयोग केला जात असे.

घरच्याच उसाचा गुळ आणि घरच्याच वावरातील बाजरी ,घरच्याच गाईचे तूप वापरून जुण्या काळात पौष्टिक खजुऱ्या केल्या जात असे, या खरपुस खजुऱ्या घरातील प्रत्येक जण आवडीने काही ..

आपण दिवाळी स्पेशल खास पारंपरिक पदार्थाच्या काही वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत त्यातील पहिली रेसिपी आहे, दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने खजुऱ्या कशा तयार करायच्या?

चला तर मग पाहू या ही पारंपरिक रेसिपी कशी तयार करायची याची सविस्तर माहिती...

साहित्य : 

1) दोन वाटी बाजरीचं पीठ

2) एक वाटी गव्हाचं पीठ 

3) एक वाटी बारीक किसलेला गूळ

4) वेलची पूड

5) तीळ

6) तूप

कृती: 

प्रथम बाजरीचं पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावं. त्यानंतर गव्हाचं पीठसुद्धा चाळून घालावं. 

चाळलेले दोन्ही पीठ एकत्र करून त्यात थोडी वेलची पूड किंवा जायफळ टाकावे. 

नंतर गूळ थोड्या पाण्यात विरघळून घ्यावा. नंतर मग ते गुळाचं पाणी आणि तीळ टाकून हे पीठ चांगलं मळून घ्यावं. पीठ मळल्यानंतर दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवुन मुरू द्यावं. 

नंतर त्याची एकसारखी कोळपाटावर मोठी पोळी लाटुन घ्यावी. शंकरपाळ्याच्या चमच्याने त्या पोळीच्या चौकोनी वड्या कापाव्यात. आणि त्या वड्या तुपात खमंग तळून घ्याव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT