फूड

ज्युसरचा वापर न करता झटपट बनवा फळांचा ज्युस; वाचा रेसिपी

सकाळ वृत्तसेवा

अनेकजण ज्युसर किंवा काही संबंधित उपकरणांचा वापर करतात. अशावेळी तुम्ही काही सोप्या ट्रीक्सनी फळांचा ज्युस तयार करु शकता.

माझ्याकडे ज्यूसर नाहीये त्यामुळे ज्यूस करत नाही. ही तक्रार अनेक महिला करतात. याशिवाय आपल्यापैकी अनेकांना फळे खाण्याचा कंटाळा येतो. मग ती कापून खाणे असतो किंवा मग डायरेक्ट खाणे असो. लहानगी सुद्धा हा कंटाळा करतात. फळे खाताना तो अनेक नखरे करतो, अशा मुलांच्या तक्रारी आई सांगत असते. यावेळी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ फळांचा रस किंवा ज्युस करुन देण्याचा सल्ला देतात. यासाठी अनेकजण ज्युसर किंवा काही संबंधित उपकरणांचा वापर करतात. अशावेळी तुम्ही काही सोप्या ट्रीक्सनी फळांचा ज्युस तयार करु शकता. जो आरोग्यासाठी लाभदायक असतोच शिवाय बनवण्यासाठी खूप कमी कालावधी लागतो. शिवाय तुम्ही जीममध्ये जात असाल तर या ज्युसचे सेवन करुन जाऊ शकता. जे शरीरासाठी उत्तम आणि पोषन देते आणि ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. अशा एका ज्यूसची रेसिपी आज आम्ही सांगणार आहोत. जी चवदार असेल आणि ज्यासाठी कमी वेळ लागेल.

साहित्य -

  • केळी, चिकू, सफरचंद - प्रत्येकी १

  • ओरिओ बिस्कीट - १

  • पिनट बटर - आवश्यकतेनुसार

  • दूध - २ ग्लास

  • काजू, बदाम, पिस्ता, केशर - आवश्यकतेनुसार

  • साखर - आवश्यकतेनुसार

कृती - सुरुवातील फळे स्वच्छ धुवून घ्या. यानंतर त्यांच्या साली काढून घ्या. ही सर्व फळे मिक्सरच्या भांड्यात घाला. यानंतर यात दूध, ओरिओ बिस्कीट, पिनट बटर, काजू, बदाम, पिस्ता, केशर असं सर्व घटक एकत्र करा. यामध्ये साखर टाका. या संपूर्ण मिश्रणाला एकदम बारीक करुन घ्या. आवश्यकता असल्यास तुम्ही अजून दुधाचा वापर करु शकता. या मिश्रणाचे एक पातळ पेय तयार होईल. या ज्युसला तुम्ही ग्लासमध्ये काढून पिऊ शकता. तुम्ही याच घटकांचा वापर करुन विविध फळांचा ज्युस करु शकता. फळांमधून तुम्हाला वेगवेगळे पोषकतत्व मिळू शकतात. जी शरिराची ताकद वाढवण्यास मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

SCROLL FOR NEXT