Rava Dosa Recipe esakal
फूड

Rava Dosa Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा चवदार रवा डोसा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Rava Dosa Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये दाक्षिणात्या पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडते.

Monika Lonkar –Kumbhar

Rava Dosa Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये दाक्षिणात्या पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडते. या सगळ्यांमध्ये डोसा खायला तर सगळ्यांनाच आवडते. डोसामध्ये अनेक प्रकार पहायला मिळतात. साधा डोसा, पनीर डोसा, रवा डोसा. यातला रवा डोसा हा बनवायला अतिशय सोपा आणि चवीला उत्तम लागतो.

सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्याला बनवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हा डोसा बनवण्यासाठी फार साहित्याची गरज भासत नाही. कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात हा डोसा तयार होतो. ही एक परफेक्ट ब्रेकफास्ट रेसिपी आहे, जी कमी वेळेत बनवता येते. या डोसाची चव देखील मस्त लागते. चला तर मग जाणून घेऊयात रवा डोसाची ही सोपी रेसिपी.

रवा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • रवा १ कप

  • तांदळाचे पीठ १ कप

  • हिरवी मिरची बारीक चिरलेली

  • आले बारीक चिरलेले

  • जिरे अर्धा चमचा

  • काळी मिरी पावडर अर्धा चमचा

  • हिंग चिमूटभर

  • तेल आवश्यकतेनुसार

  • चवीनुसार मीठ

रवा डोसा बनवण्याची सोपी पद्धत

  • रवा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये रवा आणि तांदळाचे पीठ एकत्रितपणे मिसळा.

  • आता या मिश्रणात जीरे, हिंग, हिरवी मिरची, आलं काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ मिसळा.

  • आता या मिश्रणात तुमच्या अंदाजानुसार पाणी मिसळा आणि डोसाचे बॅटर तयार करून घ्या.

  • साधारणपणे अर्ध्या तासासाठी हे डोसा बॅटर झाकून ठेवा.

  • अर्ध्या तासानंतर आता डोसा करायला घ्या.

  • गॅसवर डोसा पॅन गरम करायला ठेवा. या पॅनवर तेल पसरवून घ्या आणि डोसा बॅटर घाला.

  • डोसा बॅटर जास्त पातळ असता कामा नये याची काळजी घ्या.

  • आता रवा डोसा दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत खरपूस भाजून घ्या.

  • तुमचा गरमागरम रवा डोसा तयार आहे.

  • नारळाची चटणी किंवा सांबारसोबत हा रवा डोसा खायला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

SCROLL FOR NEXT