Vangyacha Bharta 
फूड

पावसाळ्याचा आनंद लुटा! कांद्याची पात घातलेलं असं वांग्याचं भरीत ट्राय करा

कांद्याची पात घालून वांग्याचं भरीत ट्राय करा

सकाळ डिजिटल टीम

पावसाळा सुरू झाला की मेंथी, शेपू ,पालक अशा पालेभाज्यांची चव निघून जाते. मग अशावेळी तुम्ही कांद्याची पात घालून वांग्याचं भरीत करू शकता. उन्हाळ्यात काही शेतकऱ्यांनी कांदा लावलेला असतो. त्यामुळे बाजारात कांद्याची पात सहज उपलब्ध होते. (how to make vangyacha bharta check recipe)

वांग्याचं भरीत करण्यासाठी लागणारे साहित्य -

१) एक भरताचं वांगं (गॅसवर भाजून गर काढून )

२) दोन मध्यम बारीक चिरलेले कांदे

३) एक वाटी कोवळी कांदापात बारीक चिरलेली

४) ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या

५) ३ ते ४ हिरव्या मिरच्या खरडा

६) मुठभर भाजलेले शेंगदाणे

७) तेल, मीठ, जिरं चवीनुसार

वांग्याचं भरीत कसे करावे?

  • भरीताचं वागं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. नंतर त्याला चाकूने उभे काप मारुन आतून वांगं खराब तर नाही ना याची खात्री करुन घ्यावी. आणि नंतर मग ते थोडंसं तेल लावून गॅसवर भाजायला ठेवावे. वांग खरपूस भाजलं की त्यावरचे आवरण काढून टाकून छानपैकी आतील गर काढून घ्यावा.

  • नंतर कढईत तेल गरम करायला ठेवावं. तेल कडकडीत तापलं की जिरे टाकवे. जिरे तडतडले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा खरपूस कलसला की त्यात बारीक कुटलेला लसून आणि मिरचीचा खरडा घालून त्याला चांगल कलसू दयावे.

  • नंतर मग त्यात भाजलेले शेंगदाणे, मीठ आणि कांद्याची पात टाकावी. हे मिश्रण जरासं परतून घेऊन मग त्यात वांग्याचा गर घालून ८ ते १० मिनिटं बारीक गॅसवर चांगलं खरपूस शिजू द्यावं आणि नंतर गॅस बंद करावा. तुम्हाला आवडत असेल तर बारीक चिरलेला थोडा कोथिंबीर तुम्ही या भरीतात घालु शकता.

  • अशारितीने कांद्याची पात घालून तयार केलेलं वांग्याचं भरीत तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळी सोबत खाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT