Veg Cutlets Recipe esakal
फूड

Veg Cutlets Recipe : नाश्त्याला बनवा चविष्ट व्हेज कटलेट्स, एकदम सोपी आहे रेसिपी

Veg Cutlets Recipe : जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी टेस्टी आणि हेल्दी पर्याय हवा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलो आहोत.

Monika Lonkar –Kumbhar

Veg Cutlets Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज खायला काय करावे? असा प्रश्न आपल्याला सतत पडत असतो. बर नेहमीच ते पोहे, उपमा, इडली आणि सॅंडवीच खाऊन अनेकांना कंटाळा आलेला असतो. काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खायला सगळ्यांनाच आवडते.

जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी टेस्टी आणि हेल्दी पर्याय हवा असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव आहे व्हेज कटलेट्स. सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट बनवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या रेसिपीबद्दल.

व्हेज कटलेट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • अर्धा कप मैदा

  • कोबी (बारीक चिरलेला)

  • गाजर (बारीक चिरलेला)

  • फरसबी (बारीक चिरलेली)

  • शिमला मिरची (आवश्यकतेनुसार)

  • १ बटाटा (उकडलेला)

  • जिरे

  • आलं-लसणाची पेस्ट

  • ४-५ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • लाल तिखट अर्धा चमचा

  • मीठ

  • कटलेट्सच्या कोटिंगसाठी ब्रेड क्रंम्ब्स

  • तेल

व्हेज कटलेट्स बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल गरम करा.

  • या तेलामध्ये जिरे आणि आलं-लसणाची पेस्ट टाका.

  • आता यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या (फरसबी, कोबी, गाजर, शिमला मिरची)सोनेरी होईपर्यंत तेलात परतून घ्या.

  • त्यानंतर, या मिश्रणात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लाल तिखट, मीठ घाला.

  • आता हे मिश्रण चांगले परतून घेतल्यानंतर थंड व्हायला ठेवा.

  • आता या मिश्रणात उकडलेला किंवा उकडून स्मॅश केलेला बटाटा घाला.

  • आता या मिश्रणाचे गोल आकारात किंवा तुमच्या आवडीच्या आकारात कटलेट्स बनवून घ्या.

  • आता या कटलेट्सवर थोडा मैदा पसरवा.

  • त्यानंतर, ब्रेड कंम्ब्रसमध्ये ते कोट करून घ्या.

  • आता दुसऱ्या बाजूला कढई गरम करायला ठेवा.

  • त्यात तेल घालून हे व्हेज कटलेट्स सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

  • तुमचे गरमागरम व्हेज कटलेट्स तयार आहेत.

  • चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करायला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT