Tilachya Koslya Esakal
फूड

Makar Sankranti 2023: मकरसंक्रांत स्पेशल खुशखुशीत तिळाच्या कोसल्या कशा तयार करायच्या?

तिळाच्या कोसल्या हा विदर्भात मकरसंक्रांतीला तयार केला जाणारा एक पारंपरिक पदार्थ आहे

दिपाली सुसर

Makar Sankranti 2023: तिळाच्या कोसल्या हा विदर्भात मकरसंक्रांतीला तयार केला जाणारा एक पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्र इतर ठिकाणी मकरसंक्रांतीला जशा तिळाच्या वड्या ,तिळाच्या पोळी, तिळाचे लाडु बनवतात पण विदर्भात मात्र तिळाच्या पौष्टिक कोसल्या तयार केल्या जातात.

साहित्य:

● दोन वाटी तिळ

●अर्धा वाटी किसलेले सुुके खोबर

● दोन चमचे खसखस 

● पाऊण वाटी गुळ

● तूप 2 चमचे

● दोन वाटी मैदा 

● एक वाटी बारीक रवा 

● तेल

● सुकामेवा

● वेलचीची जायफळ पूड

कृती:

मैदा आणि बारीक रवा व किंचित मीठ एकत्र करून कडकडीत तूपाचे मोहन घालून घट्ट भिजवावे व एक तास झाकून ठेवावे. कढईत सुके खोबरे चांगले परतून घ्यावे व तीळही परतून घ्यावे आणि सुका मेवा खसखस परतून गॅस बंद करावा.मिश्रण थंड झाल्यावर त्यात गुळ व वेलची जायफळ पूड टाकून एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.एक तासानंतर पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करावेत. त्याच्या पुऱ्या लाटून ठेवाव्या. पुरीच्या मध्यावर सारण ठेवून कडेला दूध किंवा पाणी लावून तिची घडी घालावी. कडा एकमेकांवर जोडून बोटानी दाबून चिकटवाव्या.करंजीच्या चमच्याने आकार देऊन सगळ्या  कोसल्या करून झाल्यावर तेलात मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT