Ragi Laddoo  sakal
फूड

Ragi Laddoo Recipe: आजारांपासून दूर राहायचे असेल तर खा नाचणीचे लाडू, जाणून घ्या रेसिपी

संधिवात आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहेत.

Aishwarya Musale

तुम्हाला जर का आरोग्यदायी नाचणीचा नियमितपणे आहारात समावेश केल्यास तुम्ही नक्कीच तंदुरुस्त राहू शकता. नाचणी शरीराला अनेक कारणांसाठी उपयुक्त असते. त्याचे फायदे वेळीच समजून घेतल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते.

नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. तांदूळ आणि गहू आणि ज्वारी पेक्षा किती तरी पटीने जास्त पोषकद्रव्ये नाचणीमध्ये असतात. संधिवात आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहेत. चला तर मग बघू ,बहुगुणी नाचणीचे लाडू कसे तयार करायचे?

साहित्य:

  • दीड वाटी नाचणीचे पीठ

  • अर्धा वाटी साजूक तूप (वितळलेले)

  • एक वाटी पिठी साखर

  • कप जाडे पोहे

  • वेलची पूड

  • खोबरा किस

  • थोडसं दुध

  • काजू,बदामाचे बारीक काप

कृती:

तूप कढईत घेवून गरम होवून द्यावे. त्यात पोहे तळावेत. पोहे पटकन जळतात म्हणून फुलले की लगेच बाहेर काढावेत. याच तुपात नाचणीचे पीठ घालून मंद आचेवर भाजावे. साधारण 10 ते 15 मिनिटे किंवा पीठ भाजल्याचा छान वास येईपर्यंत भाजावे. सतत ढवळत राहा. ढवळायचे थांबल्यास पीठ जळण्याची शक्यता असते.

पीठ छान भाजले गेले की त्यात दुध घाला. मग छान ढवळा. नंतर मग गॅस बंद करावा. मिश्रण कोमट झाले की त्यात तळलेले पोहे बारीक करुन टाकावे नंतर भाजलेले सुके खोबरे, वेलची पूड, पिठीसाखर आणि सुकामेवा घालून हे लाडूचे मिश्रण छान एकत्र करावे. आणि नंतर लाडू तयार करावे.

या लाडूचे सेवन केल्याने पाठदुखी आणि हाडांशी संबंधित अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते. हिवाळ्यात नाचणीचे हे लाडू जरूर करून पहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT