Instant Breakfast Recipe esakal
फूड

Instant Breakfast Recipe : रोजच्या ब्रेकफास्टने कंटाळा आलाय; मग झटपट बनवा रवा पोहे डोसा

फक्त १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट डोसा

सकाळ डिजिटल टीम

Instant Breakfast Recipe : रोज रोजच्या नाश्त्याच्या खाण्याने तुम्हाला कंटाळा आला असेलच ना? शिवाय मुलांना डब्यात नक्की काय द्यावं हाही विचार सुरू असेलच.. पण आता नाही; फक्त १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट डोसा.. रवा आणि पोह्यांचा वापर करून मस्त ,मुलांच्या आवडीचे इन्स्टंट डोसे आणि चटणी ब्रेकफास्ट साठी बनवा; रोजच्या खाण्यात काहीतरी वेगळं आणि मस्त डिश होईल.

साहित्य

2 कप पोहे

1 कप रवा

2 टेबलस्पून बेसन/ तांदळाचे पीठ

1/2 कप दही

2 टेबलस्पून आलं, लसूण मिरची पेस्ट

1/2 टीस्पून मीठ

2 कप पाणी...आवश्यकतेनुसार जास्त

2 टेबलस्पून तेल

चटणीसाठी

1/2 कप खोबरे

1/2 कप कोथिंबीर

1/4 कप पुदिना पाने

1/2 कांदा

3 हिरव्या मिरच्या

1/2 इंच आलं

1 इंच चिंचेचा तुकडा

1 टीस्पून साखर

1/4 टीस्पून मीठ

1/4 कप पाणी...आवश्यकतेनुसार कमी जास्त

कृती

स्टेप 1

पोहे आणि रवा मिक्सर मधून बारीक करून घ्या.

स्टेप 2

त्यात दही, आलं लसूण मिरची पेस्ट,मीठ,बेसन घालून नीट मिक्स करा. पाणी घालून बॅटर तयार करा. पंधरा - वीस मिनिटे झाकून ठेवा म्हणजे रवा छान फुलेल. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा छान मिक्स करून घ्या.

स्टेप 3

तवा गरम करून त्यावर ब्रशच्या सहाय्याने तेल लावून, तयार बॅटरचे पळीच्या साहाय्याने डोसे बनवा. दोन तीन मिनिटांनी उलटून दुसरी बाजू पण भाजून घ्या.

स्टेप 4

चटणीसाठीचे सर्व साहित्य मिक्सर मध्ये घालून फिरवून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून चटणी तयार करा.

स्टेप 5

गरम गरम डोसे चटणी सोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT