Healthy Breakfast Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : आपल्या आजीच्या पद्धतीने बनवा खास तांदळाची उकड

सकाळी उठल्यानंतर कडकडून भूक लागलेली असते

सकाळ डिजिटल टीम

Healthy Breakfast Recipe : सकाळी उठल्यानंतर कडकडून भूक लागलेली असते आणि रोजचा प्रश्न असतो तो म्हणजे आजचा नाश्ता काय? तेच तेच पोहे आणि उपमा, डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही घरच्या घरी अगदी कितीही घाई असली तरीही पटकन असा नाश्ता बनवू शकता. सकाळी उठल्यानंतर नेहमी हेल्दी खावं असं सांगण्यात येतं. तसंच भरपेट नाश्ता केला तर दिवसभर तुम्ही उत्साही राहाता. असाच एक पदार्थ म्हणजे तांदळाची उकड.

तांदळाची उकड

कृती

2 ग्लास ताक

2 मोठे चमचे तांदूळ पीठ

2 हिरव्या मिरच्या

कोथिंबीर

चवीनुसार मीठ

2-3 लसूण पाकळ्या

थोडंसं किसलेलं आलं

चिमूठभर साखर

मोहरी

तेल

कृती

Step 1: आलं, लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या एकत्र ठेचून घ्या.

Step 2: ताकामध्ये हे घाला.

Step 3: त्यामध्ये मीठ, साखर आणि तांदळाचं पीठ घालून नीट मिक्स करून घ्या.

Step 4: हे मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ठेवू नका. दुसऱ्या कढईत एक चमचा तेल घाला.

Step 5: त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कडीपत्ता घालून फोडणी द्या.

Step 6: लगेच वरून हे ताकातल तयार मिश्रण ओता आणि ढवळून झाकून ठेवा.

Step 7: एक उकळी काढून त्यात कोथिंबीर घाला.

Step 8: त्यानंतर शिजल्यावर काढून डिशमध्ये सर्व्ह करा.

खाताना याबरोबर वरून कच्चं तेल घेतलं तर ते अजून चविष्ट लागतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT