Java Plum juice recipe
Java Plum juice recipe  file photo
फूड

आहारवेद : जांभळाचं सरबत तयार करा फक्त 15 मिनिटात

शर्वरी जोशी

उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यात त्रासदायक ठरणारी समस्या म्हणजे सतत लागणारी तहान. वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे त्याचा परिणाम थेट आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे घशाला कोरड पडणे, सतत तहान लागणे या समस्या निर्माण होतात. तहान लागली की आपण बऱ्याचदा कोल्ड्रिंक, ज्यूस अशा थंड पदार्थांकडे धाव घेतो. परंतु, वरवर थंड वाटणारे हे पदार्थ शरीरासाठी तितकेच घातक आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कधीही घरी तयार केलेली सरबत, ताक अशाच पदार्थांचं सेवन करावं.

उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात रानमेवा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. कैऱ्या, जांभूळ, करवंद, ताडगोळे या फळांची या दिवसात काही कमी नसते. परंतु, अनेक जण यात जांभूळ व करवंद फारसे आवडीने खात नाहीत. त्यामुळे या उन्हाळ्यात जांभळाचं सरबत करणं अत्यंत फायदेशीर ठरेल. म्हणूनच हे सरबत कसं तयार करावं ते जाणून घेऊयात.

साहित्य -

२५० ग्रॅम जांभूळ

अर्धा चमचा लिंबाचा रस

१५० ग्रॅम साखर

अर्धा चमचा चाट मसाला

चवीपूरतं मीठ व सैंधव मीठ

२०० मिली पाणी

बर्फ

कृती -

प्रथम जांभूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यातील गर सुरीच्या मदतीने काढा. सगळ्या जांभळांचा गर काढून झाल्यावर तो मिक्सरमध्ये टाका. सोबतच साखर, लिंबाचा रस मिक्स करुन सगळं मिक्सरमध्ये एकजीव करुन घ्या. हे मिश्रण करत असतांना त्यात थोडं-थोडं पाणी टाका. त्यानंतर हे सरबत एका सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून त्यात सैंधव मीठ व मीठ, चाट मसाला घालून एकत्र करा. त्यानंतर सर्व्ह करतांना त्यात बर्फाचे खडे टाका. अशा पद्धतीने जांभळाचं सरबत तयार. ( मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी साखर न घालता हे सरबत तयार करावं.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT