Moong Dal Kabab Recipe In Marathi  
फूड

कबाब खायला आवडते! मग बनवा 'या' रेसिपीज

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - कबाबचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. विशेषतः संध्याकाळी चहासह भारतीयांना कबाब खायला आवडते. मात्र कबाबचे नाव ऐकताच सर्वप्रथम मांसाहाराचा विचार डोक्यात येतो. आम्ही येथे तुम्हाला शाकाहारी कबाबचे काही सर्वोत्तम रेसिपीजविषयी सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊ या...

मखमली कबाब

साहित्य

- राजमा - एक कप भिजवलेले, बटाटा - १ उकडलेला. पनीर- २ चमचे, ब्रेड चुरा - २ चमचे, अद्रक - १/२ चमचे, हिरवी मिरची - २ बारीक केलेली, लाल मिरची पावडर - १/२ चमचा, चाट मसाला - १/२ चमचा, मीठ - चवीनुसार, कोथिंबीर - २ चमचे, तेल - ३ चमचे

कृती

- सर्वप्रथम तुम्ही भिजवलेले राजमा कुकरमध्ये टाकून उकडून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.

- आता राजमा पेस्ट भांड्यात काढून घ्या. त्यात उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, अद्रक चाट मसाला, मिरची पावडर आणि मीठ टाकून मिक्स करुन घ्या.

- पॅन गरम होण्यासाठी ठेवून द्या.

- आता तुम्ही राजमा मिश्रण घ्या आणि मधे थोडेसे पनीर टाकून कबाबच्या आकार बनवून घ्या. नंतर ब्रेड चुऱ्यात लपेटून घ्या आणि पॅनमध्ये टाकून तळून घ्या.

वाॅलनट पनीर कबाब

वाॅलनट पनीर कबाब

साहित्य

- वाॅलनट १ कप , पनीर - १/२ चमचे, ब्रेड चुरा - २ चमचे, अद्रक - १/२ , हिरवी मिरची - २ बारीक कापलेली, लाल मिरची पावडर - १/२ चमचे, चाट मसाला - १/२ , मीठ चवीनुसार, कोथिंबीर २ चमचे, तेल - ३ चमचे, मिक्सर केलेले गाजर - १/२ कप

कृती

- सर्वप्रथम वाॅलनटला रोस्ट करा आणि थंड झाल्यानंतर मिक्सरममध्ये बारीक करुन घ्या.

- आता या मिश्रणात पनीर, हिरवी मिरची, चाट मसाला, अद्रक, मीठ आदी साहित्य टाकून चांगले मिक्स करुन घ्या.

- त्यानंतर या मिश्रणात गाजरही टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करुन घ्या. आता मिश्रणातून कबाबचे आकार बनवून घ्या.

- पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. कबाब सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

मसाला ब्रेड पोहा कबाब

मसाला ब्रेड पोहा कबाब

साहित्य

- पोहे - दोन कप, ब्रेड चुरा - २ चमचे, अद्रक व लसूण पेस्ट - १ चमचा, हिरवी मिरची - २ बारीक कापलेली, काळी मिरची पावडर - १/२ चमचे, लाल मिरची पावडर - १/२ चमचे, चाट मसाला - १/२ चमचे, मीठ - चवीनुसार, कोथिंबीर - दोन चमचे, तेल - ३ चमचे, कांदा - १ बारीक कापलेले, उकडलेला बटाटा - १

कृती

- सर्वप्रथम पोहे पाण्यात चांगल्या प्रकारे भिजून घ्या आणि त्यात बटाटा, मीठ, काजू आणि इतर मसाले टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा

- मिश्रणातून कबाबच्या आकाराचे बनवा आणि ती भांड्यात ठेवा.

- पॅनमध्ये बटर किंवा तेल टाकून गरम करुन घ्या.

- आता कबाबला ब्रेड चुऱ्यात लपेटून घ्या. पॅनमध्ये टाकून सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

Solapur: गावगाड्याच्या राजकारणाचा उडणार ‘धुरळा’; सोमवारी झेडपीची प्रारूप प्रभागरचना, मंगळवारी सरपंचाची आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT