Khajoor Halwa Recipe esakal
फूड

Khajoor Halwa Recipe : पावसाळ्यात चवीनेच नाही तर पोषक तत्वांनी युक्त अशी टेस्टी हेल्दी खजूर हलवा रेसिपी

आज आपण अशाच एका डिशची रेसिपी जाणून घेणार आहोत. या रेसिपीचे नाव आहे खजूर हलवा.

साक्षी राऊत

Khajoor Halwa Recipe : पावसाळ्याच्या दिवसांत गरमागरम आणि चविष्ट काहीतरी खाण्याची मज्जाच वेगळी. त्यातही तुम्ही तयार करणार असलेला पदार्थ हेल्दी आणि टेस्टी असेल तर मग कॅलरीज वाढण्याचीसुद्धा चिंता मिटेल. आज आपण अशाच एका डिशची रेसिपी जाणून घेणार आहोत. या रेसिपीचे नाव आहे खजूर हलवा.

पावसाळ्याच्या दिवसांत इम्युनिटी कमकुवत होऊ लागते. त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश असणे फार गरजेचे आहे. खजूरचा हलवा हा फक्त खाण्यासाठी टेस्टीच नसून आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा फायदेशीर आहे. खजूरमध्ये फायबर, आयरन, कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि मॅग्नेशियमयुक्त असते. या पदार्थाला हेल्दी डेजर्ट असंसुद्धा म्हणता येईल.

खजूर हलव्यासाठी लागणारे साहित्य

२०० ग्रॅम खजूर

१ कप दूध

दीड कप साखर

वन फोर्थ कप तूप

१०० ग्रॅम काजू

वन फोर्थ विलायची (Food News)

खजूर हलवा बनवण्याची पद्धत

खजूर हलवा बनवण्यासाठी एका पॅनमध्ये सगळ्यात आधी दूध आणि खजूर उकळून घ्या. आता मंद आचेवर दूध घट्ट होईपर्यंत त्याला उकळवा. आता यात तूपात फ्राय केलेले काजू घाला. खजूरचे दूध जसजसे घट्ट होईल तशी यात साखर आणि काजू घाला. आता खजूराचे दूध सुकून एका काठाला वळू लागल्यास त्यात विलायची टाका. आता एका ताटात तूप लावून हे मिश्रण त्यात टाकून सेट करा. थंड झाल्यानंतर तुमच्या आवडत्या शेपमध्ये कापून सर्व्ह करा. (Recipe)

खजूर खाण्याचे शरीराला बरेच फायदे मिळतात. तुम्ही रात्री पाण्यात भिजू टाकूनसुद्धा खजूर खाऊ शकता. यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर वाढते. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हेल्दी पदार्थांपासून वेगवेगळ्या डिशेस बनवणे कधीही उत्तम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT