weight loss without exercise
weight loss without exercise Esakal
फूड

Gym मध्ये न जाताच वजन कमी करायचंय? मग Breakfast मध्ये खा हे प्रोटीनयुक्त पदार्थ

Kirti Wadkar

Weight loss without exercise: दिवसाची सुरुवात ही चांगल्या नाश्त्याने झाल्यास संपूर्ण दिवसभर एनर्जी टिकून राहण्यास मदत होते. यासाठी दिवसातील विविध आहारांमध्ये नाश्ता Morning Breakfast हा अत्यंत महत्वाचा आहे. यासाठीच नाश्ता हा अत्यंत पोषक असणं गरजेचं आहे. Know how to loose weight without doing gym exercises

जर तुम्ही पोषकतत्वं असलेल्या नाश्त्यानं Breakfast दिवसाची सुरुवात केली तर तुम्हाला दिवसभर सतत भूक लागणार नाही शिवाय ऊर्जा Energy देखील टिकून राहिल. खास करून जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

प्रोटीनयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे सारखी भूक लागत नाही. शिवाय मेटाबोलिजम सुधारतं आणि वजन कमी होण्यास मदत होते.

आज आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी झटपट होणाऱ्या काही प्रोटीनयुक्त पदार्थांचे पर्याय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास Weight Loss मदत होईल.

मुगाचं धिरडं किंवा डोसा- भिजवलेल्या आणि मोड आलेल्या मुगाचं धिरडं किंवा मूग डोसा हा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. मुगामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यानं तसंच कॅलरी कमी असल्यानं वेटलॉस डाएटसाठी तुम्ही नाश्त्यामध्ये मुगाचं धिरडं किंवा डोसा आणि ओल्या नारळाची चटणी यांचा समावेश करु शकता.

लापशी उपमा- गव्हाशी लापशीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असतं. यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि तुम्हाला सतत भूक लागत नाही. शिवाय यामध्ये प्रोटीनचं प्रमाण देखील चांगलं असतं. तुम्ही नाश्त्यासाठी गाजर, सिमला मिरची, मटार अशा भाज्या टाकलेला गव्हाच्या लापशीचा उपमा बनवू शकता.

हे देखिल वाचा-

पोहे- पोहे हा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम ब्रेकफास्टचा पर्याय आहे. पोह्यामध्ये अत्यंत कमी कॅलरी असून त्यात हेल्दी कार्ब्स असतात. तसंच पोहे पचायला हलके असून यात चांगले प्रोबायोटिक उपलब्ध असतात.

तसंच पोह्यांमुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. पोह्यांमद्ये विविध भाज्या टाकून बनवल्यास शरीरासाठी आवश्यक इतरही व्हिटॅमिन्स शरीराला मिळतात.

अंडी- नाश्त्यामध्ये अंड्यांच्या वेगवेगळ्या रेसिपींचा समावेश करणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये उकडलेली अंडी, व्हेडिटेबल ऑमलेट किंवा भुर्जी आणि ब्राऊन ब्रेड हे काही झटपट होणारे पर्याय आहेत.

अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत आहे. प्रोटीनसोबतच अंड्यांमध्ये विविध सेलेनियम आणि रायबोफ्लेविन सारखी खनिजं आणि व्हिटॅमिन आढळतात.

ओट्स बनाना स्मूदी- झटपट आणि प्रोटीनयुक्त ब्रेकफास्टमध्ये ओट्स बनाना स्मूदी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. केवळ एक केळं, अर्धा वाटी ओट्स आणि दूध यापासून तुम्ही ओट्स बनाना स्मूदी तयार करू शकतात.

ओट्स बनाना स्मूदीमुळे देखील तुमचं पोट बराच वेळ भरलेलं राहतं. सतत भूक लागत नाही त्यांमुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही या स्मूदीचं सेवन करू शकता. या काही पर्यायांसोबतच इडली चटणी किंवा नाचणीचे डोसे तसचं पनीर पराठा आणि पनीरपासून तयार करण्यात आलेल्या विविध पदार्थांचा तुम्ही नाश्त्यामध्ये सहभाग करू शकता.

हे देखिल वाचा-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT