Kojagiri Purnima Milk Recipe
Kojagiri Purnima Milk Recipe Esakal
फूड

Kojagiri Purnima Milk Recipe: कोजागिरी स्पेशल दूध कसे तयार करायचे?

सकाळ डिजिटल टीम

यंदा 9 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद ऋतूतील आश्‍विन महिन्यातील 'आश्‍विनी पौर्णिमा' साजरी करण्यात येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळेस चंद्राच्या साक्षीने सुकमेवा वापरून मसाला दूध पिण्याची प्रथा चालत आलेली आहे. हे दूध वेगवेगळ्या आणि आपापल्या पद्धतीने बनवले जाते.आपल्यातील बऱ्याच जणांना खास कोजागिरिच्या दिवशी बनवले जाणारे दूध कसे बनवावे याची माहिती हवी असेल तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठी आहे

जाणून घेऊयात कोजागिरी स्पेशल दूध बनवण्याची रेसिपी. दूधामध्ये नैसर्गिकरित्या थंडावा आणि शरीराला आवश्यक पोषणतत्त्वांचा समावेश असतो. यामुळे दूध हे पूर्ण अन्न समजले जाते. कोजागिरीच्या रात्री चंद्र, चांदण्याची शीतलता शरीराला मिळावी म्हणून त्याच्या छायेखाली बसून दूध आटवून ते पिण्याचा सल्ला दिला जातो.काही जण साखर, सुकामेवा, जायफळ, वेलची,केशर याचबरोबर खास तयार मिल्क मसाला टाकूनही हे मसाला दूध करतात.

पौर्णिमा या दिवशी रात्रीच्या वेळेस चंद्राच्या साक्षीने सुकमेवा वापरून मसाला दूध पिण्याची प्रथा चालत आलेली आहे.हे दूध वेगवेगळ्या आणि आपापल्या पद्धतीने बनवले जाते.आपल्यातील बऱ्याच जणांना खास कोजागिरिच्या दिवशी बनवले जाणारे दूध कसे बनवावे याची माहिती हवी असेल तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठी आहे. जाणून घेऊयात कोजागिरी स्पेशल दूध बनवण्याची रेसिपी.

साहित्य

एक लिटर दूध

अर्धा कप साखर

काजू, बदाम,पिस्ता (आवडीनुसार)

विलायची पावडर

जायफळ पावडर

एक चमचा खसखस

चार ते पाच खारीक 

5-6 काड्या केशर

प्रथम गॅस सुरू करून त्यावर एका पसरट भांड्यात दूध उकळायला ठेवावे. दूध उकळे पर्यंत दुधात टाकण्यासाठी मसाला तयार करून घ्यावा. त्याकरिता मिक्सरच्या भांड्यात काजू, बदाम,विलायची, खसखस आणि जायफळ, एकत्र पूड करून घ्यावी. खारका थोड्या भाजून घेऊन त्याची पूड तयार करून घ्यावी. त्यानंतर काजू बदामाचे पूड व खारकेची पूड एकत्र मिक्सरमधून फिरवून घ्यावे. अशाप्रकारे मसाला दुधाचा मसाला तयार करून घ्यावा.

आपण दुधाकडे वळू. गॅस वर असलेले दूध पंधरा ते वीस मिनिट उकळू द्यावे. त्यानंतर त्यामध्ये तयार केलेला मसाला टाकावा. टाकताना दूध सतत फिरवत राहावे. म्हणजे मसाल्याच्या गुठळ्या होणार नाही. त्यानंतर त्यात साखर घालावी तसेच केशरही घालावे व जवळपास पाच मिनिटे चांगले उकळू द्यावे.आता त्या त आपल्या आवडीप्रमाणे सूक्‍या मेव्याचे तुकडे घालू शकतो. असे हे तयार दूध, चंद्राच्या किरणांमध्ये रात्रीच्या सुमारास ठेवून, नंतर त्या अशा औषधी युक्त दुधाचे प्रसाद म्हणून प्राशन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT