How to make Kurdai Recipe
How to make Kurdai Recipe esakal
फूड

Kurdai Recipe : डबल फुगणारी गव्हाची कुरडई कशी बनवायची?

Pooja Karande-Kadam

Kurdai Recipe : उन्हाळ्यात काही लोकांना फिरायला जाण्याची घाई असते. तर काहींना गावी जाऊन आमरसावर ताव मारण्याची. पण, घरच्या करत्या स्त्रीला काळजी असते ती वर्षभराच्या साठवणीच्या वाळवणाची. आता उन्हाळा संपत आल्याने अनेक गृहिणी वाळवणाच्या मागे लागल्या आहेत.

वाळवणं, वर्षभराच्या शेवया, कुरडई, पापडच्या वेगवेगळ्या रेसिपी होतात. कुरडई अनेक प्रकारची होते. तांदळाची कुरडई कॉमन आहे. पण, गव्हाच्या कुरडईबद्दल तुम्ही फार ऐकलं नसेल. कारण, गव्हाची कुरडई आपला पारंपरिक पदार्थ आहे. घरात असलेल्या आजीबाईंना नक्कीच याची रेसिपी माहिती असेल. त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत.   

गव्हाचा हा चीक खरोखरंच खूप पौष्टिक असतो. त्यामुळे तो उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर खाऊन घेतला पाहिजे. चीक हे एक प्रकारचे आपले पारंपरिक सुपरफूड आहे. त्यामुळे अशक्त व्यक्तींनाही गव्हाचा चीक खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात.  

गव्हाची कुरडई करण्यासाठी लागणारे साहित्य

1 किलो गहू

चवीनुसार मीठ

गव्हाची कुरडई करण्याची कृती(How to make Kurdai Recipe)

प्रथम गहू तीन दिवस पाण्यात भिजत घातले. त्याचे पाणी रोज बदलून टाकले. मग ते गिरणीतून काढून आणले. आपण घरी पण मीक्सरमधे इंचरवर बारीक करू शकतो. त्याला फक्त थोडे इंचरवर फीरवून घ्यावे लागते.

मग ते गव्हाचे मिश्रण हाताने दाबून त्यातील चीक काढला असे दोन पाण्यात ते घालून दाबून त्यातील चीक काढून घेतला. मग ते चिकाचे पाणी गाळणीने गाळून घेतले. नंतर ते चिकाचे पाणी चाळणीवर तलम कापडाने गाळून घेतले. म्हणजे त्यातील सर्व ताम नीघून जाते.

आता गाळलेले मिश्रण रात्रभर झाकून ठेवले. मग सकाळी त्यातील वरचे पाणी संथपणे काढून घेतले.व खाली जमा झालेला चीक त्याला खडी असे म्हणतात ते फोडून घेतले.

आता गॅस वर एक पातेले ठेवून त्याला थोडासा तेलाचा हात फिरवून घेतला व त्यात चीका एवढेच पाणी घालून उकळायला ठेवले. त्याला उकळी आल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून मग चांगले खळखळ उकळल्यावर गॅस सीम करून त्यात एका हाताने चीकाची धार धरावी व दुसऱ्या हाताने भराभर लाटण्याने कींवा घोटयाने घोटावे.

चांगले घोटून घेतल्यावर त्यावर ओला पंचा घालून झाकण ठेवून वाफ आणली.साधारण १० मी नीट तरी चांगली वाफ यायला लागतात. दर २-३ मीनीटांनी हलवून घ्यावे म्हणजे चीक खाली लागत नाही.

आता सोऱ्याला जाड शेवेची चकती लावून त्याला तेलाचे बोट फिरवून घ्यावे व चीक सोऱ्यात भरून प्लास्टिक पेपर वर कुरडया घालाव्या. त्या दुसऱ्या दिवशी उलटवून ऊन दाखवून घ्यावे. मग त्या ट्रेमध्ये कींवा सुपात काढून तीसऱ्या दिवसाचे ऊन पण दाखवून घ्यावे म्हणजे कुरडई आतपर्यंत चांगली वाळते.

मग कढईमध्ये तेल गरम करून त्यात कुरडई तळून घ्यावी. ह्यि कुरडया एकदम हलक्या होतात आणि त्या डबल फुगतात.

गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

- शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. कारण साधारणपणे १०० ग्रॅम गव्हाचा चिक घेतला तर त्यातून ४५० कॅलरीज मिळतात.

- चिकामध्ये भरपूर कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडे आणि केस यांच्या मजबुतीसाठी तर तो आवश्यकच आहे. याशिवाय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे  थकवा येणे, सतेज न राहणे, नैराश्य न येणे असेही त्रास जाणवतात. हे त्रास कमी करण्यासाठी चीक भरपूर खा.

- गव्हाच्या चिकातून फॉस्फरस मिळतो. तो संपूर्ण शरीराला ताजेतवाणे ठेवण्यासाठी, थकवा घालविण्यासाठी उपयुक्त असतो. 

- उन्हाळ्यात घाम खूप येतो आणि त्यामुळे मग अनेक खनिजे शरीरातून बाहेर पडतात. यातला मुख्य घटक असतो लोह. म्हणून उन्हाळ्यात शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी चीक खावा.

- या व्यतिरिक्त चिकातून प्रोटीन्स आणि स्टार्च स्वरुपातले कार्बोहायड्रेट्सही भरपूर मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT