Healthy Breakfast sakal
फूड

Healthy Breakfast :उरलेल्या चपात्यांपासून बनवा टेस्टी रोटी बॉल्स, ही आहे सोपी रेसिपी

रोज नाश्त्याला काहीतरी नवीन खावसे वाटते ना?

Aishwarya Musale

गव्हाची पोळी खाणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. बऱ्याचदा आपल्याकडून जास्तीच्या चपात्या होतात काहीवेळा कोणी खाल्ली नाही तर चपाती उरते, अश्या वेळी त्या चपात्या पुन्हा खाल्ल्या जात नाहीत.

रोज नाश्त्याला काहीतरी नवीन खावसे वाटते ना? साहाजिकच आहे की तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो. तेव्हा काहीतरी चटपटीत वेगळं खायची इच्छा होते. तुमच्या रात्रीच्या उरलेल्या चपात्यासुद्धा आता वाया जाणार नाही. त्याचे तुम्ही यम्मी रोटी बॉल्स बनवू शकता. तेव्हा जाणून घ्या रेसिपी.

रोटी बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- उरलेल्या चपात्या

- १ कांदा

- शिमला मिरची

- कापलेले गाजर

- अर्धा चमचा लाल तिखट

- अर्धा चमचा काली मिरी पावडर

- चवीनुसार मीठ

बनवण्याची पद्धत

रोटी बॉल्स बनवण्यासाठी उरलेल्या चपात्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. एका भांड्यात हे तुकडे घाला त्यात चार ते पाच मोठे चमचे पाणी घालून ते भिजू द्या, वेगळ्या भांड्यात कांदा किसून घ्या.

त्यात शिमला मिरची गाजर कोथिंबीर मीठ लाल तिखट आणि काली मिरी पावडर घालून चांगलं एकजीव करून घ्या. भिजलेल्या चपाती मध्ये हे सर्व मिश्रण घाला आणि चपातीचज्या पिठाप्रमाणे मळून घ्या, या नंतर या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि तेलात ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या

काहींना शिळ्या चपात्या अजिबात आवडत नाही. तेव्हा या चपात्या टेस्टी बनवण्यास ही रेसिपी मदत करेल. तर एरवी शिळी चपाती बघून दूर पळणारी लोक ही रेसिपी अगदी आवडीने ट्राय करतील . सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी अगदी हेल्दी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT