Makar Sankranti 2023 Esakal
फूड

Makar Sankranti 2023: मकरसंक्रांत स्पेशल तीळ गुळाची पोळी कशी करायची?

मकरसंक्रांतीच्या निमित्तानं तिळ आणि गुळाचा वापर करून विविध पदार्थ तयार करण्यासाठी महिला प्रयत्न करतात.

दिपाली सुसर

Til Gul Poli: मकरसंक्रांतीच्या निमित्तानं तिळ आणि गुळाचा वापर करून विविध पदार्थ तयार करण्यासाठी महिला प्रयत्न करतात. त्यापैकी एक म्हणजे तीळ गुळाची पोळी. अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहे. आजच्या लेखात आपण मकरसंक्रांत स्पेशल तीळ गुळाची पोळी कशी करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य:

तिन वाटी तिळ

एक वाटी गुळ

साजूक तूप

एक वाटी गव्हाचे पीठ

अर्धा वाटी मैदा

एक चमचा वेलची पूड

कृती:

सर्व प्रथम गव्हाचे पीठ आणि मैदा चाळणीतून चाळून घ्यावा. चिमूटभर मीठ घालावे व पाण्याने सैलसर (पुरण पोळीला लागते तसे) मळून घ्यावे. 15 मिनिटे बाजूला ठेवावे.पीठाला तार नसेल तर थोडा मैदा घालावा.

तिळ मंद आचेवर खमंग भाजून घ्यावेत.थंड झाल्यावर कूट करून घ्यावा गुळ बारीक करावा/ किसून घ्यावा.नंतर तीळ व गुळ एकत्र करावे व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. मिश्रणात वेलची पुड घालावी. भिजवलेल्या पिठाचे लिंबा एवढे गोळे करावे.

प्रत्येक गोळ्याची पारी करून त्यात दोन चमचे मिश्रण दाबून घालून गोळा करावा. व गव्हाचे पींठ लावून पातळ पोळी लाटावी.नतंर तव्यावर तुप घालून पोळी मध्यम आचेवर दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावी,अशाच सर्व पोळ्या कराव्यात. वरून तूप घालून गरम गरम सर्व्ह कराव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT