Upvas Batat Puri Recipe esakal
फूड

Upvas Recipe: गुरुवारच्या उपवासानिमित्त बनवा खास बटाटा पुरी…

कालच एकादशीच्या उपवास झाला आता परत गुरुवारचा उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी नको वाटत असेल ना?

सकाळ डिजिटल टीम

Batata Puri Recipe: बटाटा हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. बटाटा वातूळ असला तरी त्यात शरीरासाठी पोषक असे अनेक गुणधर्म असतात. उपवासाच्या पदार्थांमध्ये तर बटाटा आवर्जून वापरला जातो. त्यात कालच एकादशीच्या उपवास झाला आता परत गुरुवारचा उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी नको वाटत असेल ना? 

गुरुवारच्या उपवासानिमित्त ट्राय करा बटाट्याच्या पुऱ्या.

साहित्य :-

  • २ मोठे उकडलेले बटाटे 

  • १/२ कप साबुदाणा

  • ५ मिरच्या

  • १/४ कप चिरलेली कोथिंबीर

  • १/२ टिस्पून जिरे

  • ३ टेस्पून शेंगदाणा कूट

  • १ टिस्पून जिरेपूड

  • २ टेस्पून शिंगाडा पिठ

  • चवीपुरते मीठ

  • तळण्यासाठी तेल.

कृती :-

  • १/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घाला. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे. 

  • मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मीठ घालून बारीक करा. पाणी घालू नका, शिजवलेले बटाटे किसून घ्या. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवा.  

  • तेल तापत ठेवा. प्लास्टिकवर तेलाचा हात लावून प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापा आणि तेलात टाका. पुरी तेलात टाकल्यावर झार्‍याने अजिबात पलटू नये अशाने ती तुटते. त्यावेळी झार्‍याने अलगद तेलात बुडवावी. छान ब्राऊन रंग आल्यावर काढून घ्या. गरमागरम चटणीबरोबर सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT