फूड

आवळा मुरब्बाच्या उरलेल्या पाकापासून बनवा सरबत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरीच विविध प्रकारचे लोणचे (Different types of pickles) तयार केली जातात. तसेच मुरब्बा (murabba) देखील तयार केला जातो. काही गोड पदार्थ तयार करण्यासाठी पाक तयार केला जातो. मात्र, कधी चुकीने हा पाक अधिक तयार होते. अशावेळी प्रश्न उपस्थित होते या पाकाचे काय करायचे? चला तर आपण पाकापासून सरबत कसे तयार करायचे हे जाणून घेऊ... (Make-syrup-from-the-rest-of-the-amla-murabba)

उन्हाळ्यात थंड होणाऱ्या फळांमध्येही आवळाचा उल्लेख आहे. हे लहान फळ खूप फायदेशीर आहे. विशेषतः यातून बऱ्याच प्रकारचे पाककृती बनवता येतात. मुरब्बा घरीही तयार करता येतो व बाहेरूनही खरेदी करता येतो. मात्र, मुरब्बा संपल्यानंतर साखरेचा पाक शिल्लक राहतो. अशावेळी तो पाक सहसा फेकून दिला जातो. मात्र, याच पाकाचा उन्हाळ्यातील पेय तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. ते कसे हेच आपण पाहूया...

लागणारी सामग्री

एक कप आवळ्याच वाचलेला पाक, तीन कप पाणी, एक चमचा आल्याचा रस, एक चमचा पुदिना रस, एक चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा काळे मीठ व अर्धा चमचा भाजलेला हिंग जिरा पावडर.

तयार करण्याची पद्धत

सर्वांत अगोदर आवळ्याचा उरलेला पाक एका भांड्यात काढा. हा पाक गोठलेला नाही ना याची खात्री करा. जर पाक गोठला असेल तर त्यात पाणी टाकून एकदा उकळून घ्या. पाक थंड झाल्यानंतर त्यात आले आणि पुदिनाचा रस टाका. नंतर हे मिश्रण ग्लासमध्ये घेऊन त्यावर मीठ आणि भाजलेले हिंग जिरा पावडर टाका. इच्छेनुसार बर्फाचे तुकडे टाकल्यानंतर तुमचे सरबत तयार होईल.

संकलन - नीलेश डाखोरे

(Make-syrup-from-the-rest-of-the-amla-marmalade)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT