Sprout Chat Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe: फक्त ५ मिनिटांत तयार होईल हा चटपटीत अन् हेल्दी नाश्ता…

बनवायला खूप सोपी आणि झटकीपट होणारी अशी रेसिपी आणि घरातल्या सगळ्यांसाठीच हेल्दी

सकाळ डिजिटल टीम

Sprout Chat Recipe: कधी कधी आपल्या सगळ्यांची सकाळी खूप गडबड होते, कधी ऑफिसच्या मिटिंग कधी मुलांमुळे तर कधी आपल्यालाच उठायला उशीर होत असतो म्हणून... अशात एक गोष्ट जी लोकं अगदी सहजपणे टाळतात अन् ती म्हणजे त्यांचा सकाळचा नाश्ता. 

पण असं करणं खरंच खूप चुकीच आहे म्हणून खास तुमच्यासाठी स्प्राऊट चाट, बनवायला खूप सोपी आणि झटकीपट होणारी अशी रेसिपी आणि घरातल्या सगळ्यांसाठीच हेल्दी.

साहित्य: 

- एक कप उकडलेले किंवा मोड आलेले मिक्स कडधान्य 

- पाव कप पाण्यात भिजवलेले किंवा उकडलेले शेंगदाणे 

- पाव कप चिरलेला कांदा 

- पाव कप चिरलेला टोमॅटो 

- दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर

- एक चमचा लिंबाचा रस 

- चवीनुसार मीठ

- चवीनुसार तिखट

- एक चमचा चाट मसाला

कृती: 

- ज्यांना मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्ल्याने त्रास होत नाही, त्यांनी ती कच्चीच खावीत. ज्यांना त्रास होतो त्यांनी ती उकडून घ्यावीत.

- कडधान्ये, टोमॅटो, कांदा एका बाऊलमध्ये टाकावा.

- त्यात इतर मसाले, मीठ टाकावे

- त्यानंतर त्यावर लिंबाचा रस टाकावा व नंतर कोथिंबीर टाकून सगळे मिश्रण हलवून घ्यावे.

- हेल्दी स्प्राऊट चाट रेसिपी तयार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT