Egg Sandwich Recipe esakal
फूड

Egg Sandwich Recipe : इंस्टंट होणारी मॅगी तरी ५ मिनीटं घेते पण ३ मिनिटांत तयार होतो हा पदार्थ!

सकाळचा नाश्ता नुसताच भरपेट नसावा तर तो पौष्टिक सुद्धा हवा शिवाय तो मुलांना आवडाला नाही तर काही खरं नाही

सकाळ डिजिटल टीम

Egg Sandwich : नाश्ता करणं खूप महत्वाचं आहे, बहुदा तिन्ही जेवणातला सर्वात महत्वाचा प्रकार म्हणजे नाश्ता. रोज नाश्ता करण्याची सवय खूप चांगली कारण याने आपले अनेक आजरांपासून संरक्षण होते शिवाय दिवसभरही थकवा जाणवत नाही.

घरातल्या कोणाचीही लाइफस्टाईल सेम नाही, प्रत्येकजण आपल्या वेगळ्या शेड्यूल सोबत दिवसभर काम करत असतो. अशात सकाळचा नाश्ता नुसताच भरपेट नसावा तर तो पौष्टिक सुद्धा हवा. शिवाय तो मुलांना आवडायला हवा नाहीतर काही खरं नाही.

म्हणून एग सँडविच. बघूयात याची फक्त ३ मिनिटात होणारी रेसिपी.

साहित्य :

- २ उकडलेली अंडी

- १ बारीक चिरलेला कांदा

- १ बारीक चिरलेला टोमॅटो

- १ बारीक चिरलेले गाजर

- चवीनुसार मीठ

- आवडीनुसार काळी मिरी

- चवीनुसार तिखट

- २ ब्रेड स्लाईस

- २ चमचे तेल

कृती :

१. एक बाउल घ्या आणि त्यात अंडी, कांदे, टोमॅटो आणि गाजर घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा.

२. आता त्यावर मीठ, मिरपूड आणि तिखट टाकून चांगले मिसळा.

३. आता एक पॅन घ्या आणि त्यात थोडे ऑलिव्ह तेल गरम करा.

४. अंड्याचे मिश्रण मल्टीग्रेन ब्रेडच्या दोन तुकड्यांमध्ये भरा आणि ते कुरकुरीत होईपर्यंत पॅनमध्ये टॉस करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT