Malai Peda Recipe Esakal
फूड

Malai Peda Recipe: तुळशी विवाह स्पेशल घरच्या घरी तयार करा मलाई पेडा

आश्विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात.

सकाळ डिजिटल टीम

आश्विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. उत्तम संतान प्राप्तीसाठी योग्य वेळ मिळण्याच्या दृष्टीने हेमंत ऋतूची योजना केलेली असावी. उत्तम संतानप्राप्ती यावरून स्त्री-पुरुषांचे लक्ष उडून जाऊ नये व केवळ शरीरसुख, कामनातृप्ती एवढ्यावरच समाधान मानून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू नये, यासाठी संस्कारांचा बराच भर दिलेला दिसतो. या सर्वांची व्यवस्थित जाणीव व्हावी अशा हेतूने तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला. 

हिंदू धर्मात तुलसी विवाह विशेष महत्त्व आहे. यावर्षी पाच नोव्हेंबर 2022 पासून तुलसी विवाहाच्या मुहूर्त सुरुवात होत आहे. असे मानले जाते की, भगवान विष्णूचा अवतार असलेल्या शालिग्राम जिचा विवाह माता तुळशीची विधीवत विवाह करतात. आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी राहते. तुलसी विवाह दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे साहित्याचा वापर केला जातो. तुळशी विवाहासाठी घरोघरी काही तरी गोड पदार्थ केला जातो.यंदा आपण तुळशीच्या लग्नाचे औचित्य साधुन प्रसादासाठी मलाई पेढा घरच्या घरी कसा तयार करायचा याची सविस्तर रेसिपी पाहू या.

मलाई पेडा बनवण्यासाठी साहित्य

● 1 लिटर दूध

● 100 ग्रॅम साखर

● वेलची पावडर

● बारीक चिरलेला पिस्ता

कृती:

मलाई पेडा बनवण्यासाठी प्रथम एका मोठ्या पातेल्यात एक लिटर फुल क्रीम दूध घ्या आणि सतत ढवळत असताना गरम करा. दुध उकळत असताना कढईत साय बाजूला ठेवा. अशा प्रकारे दुधापासून मावा तयार करा.

आता त्यात 150 ग्रॅम साखर घाला. मावा तयार झाल्यावर तव्याभोवती मावा पसरवा. तुम्हाला या मिश्रणाचा रंग पूर्णपणे पांढरा दिसेल. यानंतर मावा 5 ते 7 मिनिटे थंड केल्यानंतर त्यात एक-दोन चिमूट वेलची पूड घालून मिक्स करा. आता या माव्यापासून सर्व पेढे बनवा. पेढे बनवल्यानंतर त्यावर बारीक चिरलेल्या पिस्त्याने सजवा. तुमचे चविष्ट मलाई पेढे तयार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Latest Marathi News Live Update : केदारनाथ मंदिरासाठी चालवल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवा खराब हवामानामुळे स्थगित

SCROLL FOR NEXT