MASALA PAV Esakal
फूड

MASALA PAV : पावभाजीचा क्विक अवतार असलेला मसाला पाव घरच्या घरी कसा तयार करायचा?

पावभाजीचा क्विक अवतार म्हणजे नाशिकचा मसाला पाव.

दिपाली सुसर

पावभाजीचा क्विक अवतार म्हणजे नाशिकचा मसाला पाव . शाळा कॉलेजात बऱ्याच पैजा जिंकल्या किंवा हरल्यानंतरच्या आनंदोत्सवात सामील होणारा हा चटपटीत पदार्थ तुमच्या घरातील छोट्या मोठ्या स्नॅक्स पार्टीचेही आकर्षण ठरू शकते.

साहित्य:

● सहा नरम पाव

● दोन मोठे कांदे

● चार मध्यम आकाराचे टोमॅटो

● एक मोठी भोपळी मिरची

● एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा

● आल्याचा तुकडा

● आठ ते दहालसणीच्या पाकळ्या

● तिन ते चार हिरव्या मिरच्या

● पाव कप कोथिंबीर बारीक चिरून

● हळद

● एक चमचा काश्मिरी लाल मिरची पूड

● दिड चमचा टेबलस्पून पावभाजी मसाला

● मीठ

● दोन बटरचे क्यूब्स

● एक चीजचा क्यूब

कृती:

लोखंडी तव्यावर तेल चांगले तापवून घ्यावे . तेल तापले की त्यात एक चमचा बटर घालून घ्यावे . बटर वितळले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर चांगला परतून घ्यावा .कांदा परतला की त्यात आले,लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून घ्यावी ( पेस्ट बनवताना एक टेबलस्पून पाणी घालून बारीक वाटून घ्यावे )

आता हळद , बारीक चिरलेली भोपळी मिरची व थोडेसे पाणी घालून नरम होईपर्यंत शिजवून घ्यावी. तिन ते चार मिनिटे मध्यम आचेवर शिजवल्यावर भोपळी मिरची जरा नरम होते . आता त्यात चिरलेला टोमॅटो व थोडे मीठ घालून पूर्ण नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे .

जवळजवळ दहा मिनिटे शिजवल्यावर, टोमॅटो नरम झाले की आता लाल मिरची पूड, पाव भाजी मसाला , थोडी चिरलेली कोथिंबीर एक चमचा बटर आणि चवीपुरते मीठ घालून हा पूर्ण मसाला छान परतून घ्यावा . मसाले करपू नयेत म्हणून एक ते दोन चमचे पाणी घालून परतावा . छान तेल सुटू द्यावे .

मसाला चांगला परतल्यानंतर उकडलेला बटाटा चांगला कुस्करून त्याचा लगदा घालून घ्यावा . बटाट्याच्या फोडी नाही राहिल्या पाहिजेत. बटाट्याचा लगदा घातल्याने हा मसाला मस्त क्रिमी होतो आणि पावावर छान गुळगुळीत पसरतो. आता चीझ किसून घालावे जेणेकरून मसाल्यात अजून क्रीमीपणा येतो.

नंतर पाव कप पाणी घालून मिसळून घ्यावे. हा मसाला फार पातळ किंवा घट्ट नसावा , पावावर पसरण्याइतका असावा हे लक्षात घ्यावे. मसाला तयार झाल्यावर तो तव्याच्या कडेला सरकवून त्यावर कोथिंबीर भुरभुरावी.

तव्याच्या मध्यभागी थोडे बटर घालून त्यात कडेचा मसाला थोडा घालून घ्यावा . या मसाल्यावर आत बाहेर दोन्ही बाजूंना बटर लावून पाव शेकून घ्यावे .

पावाच्या मध्ये मसाला घालून आणि वरूनही मसाला लावून पावाला पूर्णपणे मसाल्याने कोट करून घ्यावे .

गरम गरम मसाला पाव, वरून चिरलेला कांदा , थोडे चीझ घालून आणि लिंबाच्या फोडी बरोबर खायला द्यावा .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT