Moong Curry Esakal
फूड

Moong Curry: मुगाच्या शेंगांची चवदार आमटी कशी तयार करायची?

मुगाच्या ओल्या शेंगांची आमटी अतिशय चवदार आणि खमंग होते.

सकाळ डिजिटल टीम

सध्या बाजारात मुगाच्या ओल्या शेंगा आल्या आहेत. त्या शेंगांची आमटी अतिशय चवदार होते. बघा त्याचीच ही खास रेसिपी. या आमटीला विदर्भात सोल्याची आमटी असंही म्हणतात. मुगाच्या ओल्या शेंगांची आमटी अतिशय चवदार आणि खमंग होते. ओले मुग शरिराला पौष्टिक असतात त्यामुळे तुम्ही नक्की ही मुगाची आमटी करून बघा.

चला तर मग आजच्या लेखात आपण बघणार आहोत मुगाची आमटी कशी तयार करायची त्याची सविस्तर रेसिपी..

साहित्य

एक वाटी मुगाचे हिरवे कोवळे दाणे

सात ते आठ लसूण पाकळ्या

चार ते पाच हिरव्या मिरच्या

अर्धा चमचा किसलेलं आलं

अर्ध्या लिंबाचा रस

चवीनुसार मीठ

थोडीशी कोथिंबीर

फोडणीसाठी तेल

मोहरी

हिंग

कृती:

सगळ्यात आधी शेंगा सोलून त्यातील दाणे वेगळे करून घ्यावे. आता कढई गॅसवर तापत ठेवावी. त्यात थोडसं तेल टाकावे. तेल तापले की मुगाचे सोललेले दाणे, लसून आणि मिरच्या कढईत टाकून मंद गॅसवर परतून घ्यावे.

2 ते 3 मिनिटे हे सगळे पदार्थ परतून घेतले की गॅस बंद करा. आता हे सगळे पदार्थ थंड होऊ द्यावे.

थंड झाल्यावर परतून घेतलेले मूग, लसूण, मिरच्या मिक्सरमध्ये टाका. त्याचवेळी त्यात थोडी कोथिंबीर आणि आलंही टाका. हे मिश्रण मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या. आता पुन्हा कढई गॅसवर ठेवून फोडणी करा.

त्यात हे वाटण टाका. वाटण परतून घेतलं की त्यात गरम पाणी टाकून आमटी हवी तेवढी पातळ करून घ्या. चवीनुसार मीठ टाका. चांगली उकळून घेतली की झाली खमंग, झणझणीत आमटी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT