Moong Dal Ladoo Esakal
फूड

Moong Dal Ladoo: हिवाळ्यात मुगाच्या दाळीचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?

मुगाच्या डाळीत असलेले लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, ब जीवनसत्व, प्रथिनं हे पोषक घटक शरीरातील अशक्तपणा दूर करुन ऊर्जा निर्माण करतात.

सकाळ डिजिटल टीम

लाडू हा महाराष्ट्रात, तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्टान्न विविध घटकपदार्थांपासून बनवले जाऊ शकते. बेसन, रवा, वेगवेगळ्या डाळींच्या पिठांसारख्या कोणत्याही एका घटकपदार्थापासून किंवा मिश्रणांपासून, तसेच बेसनासारख्या पदार्थांच्या बुंदीपासून साधारणपणे मुठीच्या आकारमानाचे गोळे वळून लाडू बनवले जातात. डाळ किंवा पिठासारख्या मुख्य घटकासोबत लाडवांत गोड चविसाठी साखर किंवा गूळ, तसेच स्निग्धतेसाठी तूप किंवा नारळाचे दूध वापरतात. असा हा चविष्ठ पदार्थ लहान मुलांना पौष्टिकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो. 

आता बघू या मुग दाळ खाण्याचे फायदे काय काय आहे?

वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरु असतील तर मुगाची डाळ आहारात अवश्य असावी. मुगाच्या डाळीत कॅलरीज कमी असतात. त्यामुळे मुगाची डाळ खाल्ल्यानं वजन नियंत्रित राहातं. वजन कमी करण्यासाठी मुगाची डाळ वरण, सूप, मोड आलेले अख्ख्या मुगाची उसळ आणि पौष्टिक खिचडीच्या स्वरुपात खाता येते. मुगाच्या डाळीत असलेले लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, ब जीवनसत्व, प्रथिनं हे पोषक घटक शरीरातील अशक्तपणा दूर करुन ऊर्जा निर्माण करतात. हिवाळ्यात दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहावी यासाठी मुगाची डाळ खाण्याला अधिक महत्व दिले जाते. आजच्या लेखात आपण मुगाच्या दाळीचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य

1) एक कप मूग डाळ (सालीची)

2) अर्धा कप तूप

3) अर्धा कप गुळाची पावडर

4) अर्धा कप दूध

5) एक चमचा वेलचीपूड

6) बेदाणे, बदाम, पिस्ता यांचे काप

कृती:

सालाची मूगडाळ रवाळ पद्धतीची दळून आणा. मध्यम गॅसवर पातेलं ठेवून त्यात थोडं तूप गरम करून त्यात मूळ डाळीचे पीठ भाजून घ्यावे. पीठ भाजत असताना त्याचा रंग बदलला की, त्यावर थोडं दूध शिंपडून ढवळून घ्यावे. गॅस बंद करा आणि भाजलेलं पीठ खाली उरवून घ्यावे. भाजलेल्या पीठ थोडंसं थंड झालं की, त्यात पिठीसाखर घाला. ते करत असताना पिठीसाखरेचे गोळे होणार नाहीत, याची काळजी घ्या. त्यानंतर त्या पीठात वेलची पूड आणि कापलेले काजू, बदाम आणि पिस्ता घाला. नंतर त्याचा लाडू बांधा. तुम्ही हे लाडू स्टीलच्या डब्यात ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

Latest Marathi News Live Update: - नेस्को ड्रग्स प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT