biryami 
फूड

जगातील सर्वात महागड्या बिर्याणीची किंमत माहितीय का? जाणून घ्या, का आहे खास

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- मांसाहारी खवय्यांसाठी बिर्याणी हा जीवाळ्याचा विषय. अनेकजण दूर-दूर ठिकाणी प्रसिद्ध बिर्याणी खाण्यासाठी जात असतात. भारतात हैद्राबादी बिर्याणी खास प्रसिद्ध आहे. भारतातील मांसाहारी लोक एकदातरी हैदराबादमध्ये जाऊन बिर्याणी खाण्याची इच्छा बाळगून असतात. पण, जगातील सर्वात महागडी बिर्याणी कोठे मिळते तुम्हाला माहिती आहे का? तसेच या बिर्याणीची किंमत (World's Most Expensive Biryani) ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

सोन्याने सजलेली बिर्याणी

जगभरात खाण्यासाठी जगणाऱ्या लोकांची कमतरता नाहीये. अशाच लोकांना समोर ठेवून दुबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरेन्टने सोन्याची बिर्याणी लॉन्च केली आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,  DIFC  मधील Bombay Borough  रेस्टॉरेन्टने जगातील सर्वात महागड्या बिर्याणीला आपल्या मेन्यूमध्ये सामाविष्ठ केले आहे. विशेष म्हणजे या बिर्याणीची किंमत तब्बल 20 हजार रुपये आहे. या बिर्याणीचे नाव रॉयल गोल्ड बिर्याणी असून याचे वजन 3 किलो आहे. त्यामुळे अनेकांसाठी ही बिर्याणी आवाक्या बाहेरची आहे. पण, दर्दी खवय्ये या सोन्याच्या बिर्याणीला एकदातरी खाण्याचा नक्की विचार करतील. 

बिर्याणीसोबत इतरही पदार्थ

या खास आणि अंत्यत महाग अशा रॉयल गोल्ड बिर्याणीसोबत काश्मिरी मटन कबाब, जुनी दिल्ली मटन चॉप्स, राजपूत चिकन कबाब, मोगलाई कोफ्ते आणि मलाई चिकनही दिले जात आहे. सोबतच रायता, करी आणि सॉसही दिला जाईल. रेस्टॉरेन्टने स्पष्ट केलंय की, बिर्याणीची ऑर्डर केल्यानंतर 45 मिनिटांच्या आत ती सर्व्ह केली जाईल. त्यामुळे ज्यांना जगातील सर्वात महागडी बिर्याणी खायची आहे, त्यांना दुबई गाठावं लागणार आहे. शिवाय गोल्डन बिर्याणीचा आनंद घेण्यासाठी 20 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard: एक बिबट्या पकडला की तिथे आणखी तीन बिबटे येतात; असं का होतं? तज्ज्ञ काय सांगतात?

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये शिवसेनेची हवा! ११ पैकी ५ नगरपालिकांवर भगवा; त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपला मोठा धक्का

मीच नाही तर सोहमही त्याचं घर सोडून आलाय... लग्नानंतरच्या बदललेल्या आयुष्याबद्दल पूजा बिरारीचा खुलासा, म्हणते-

Latest Marathi News Live Update : विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले, भाजप पक्ष एक नंबर ठरला - देवेंद्र फडणवीस

VIDEO : शाळेत मानसिक छळ, लिंगभेद आणि अपमानास्पद वागणूक; शिक्षिकेचा भावनिक व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर संताप

SCROLL FOR NEXT