शेंगदाणे sakal
फूड

पोषक-पूरक : शेंगदाणे

भुईमुगाच्या शेंगेतल्या बिया म्हणजेच शेंगदाणे. दाण्याचे बाह्यावरण गुलाबी किंवा काळपट लाल असून, आतला दाणा पांढरा असतो. ते कच्चे भाजून किंवा उकडून खाल्ले जातात.

मृणाल तुळपुळे

भुईमुगाच्या शेंगेतल्या बिया म्हणजेच शेंगदाणे. दाण्याचे बाह्यावरण गुलाबी किंवा काळपट लाल असून, आतला दाणा पांढरा असतो. ते कच्चे भाजून किंवा उकडून खाल्ले जातात. भाजलेले शेंगदाणे सोलून त्याचे भरड कूट केले जाते व त्यापासून लाडू, वड्या उपवासाची आमटी असे पदार्थ करतात. कोशिंबिरी, उपवासाची भाजणी, साबुदाण्याचे वडे व खिचडी, रताळ्याच्या कीस असे उपवासाचे पदार्थ दाण्याच्या कुटाशिवाय होऊच शकत नाहीत.

शेंगदाणे कायमच आपल्या घरात असतात. जेवणानंतर मूठभर शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे, त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते. ते प्रोटिन आणि फायबरचे भांडार असून त्यात व्हिटॅमिन ई, के आणि बी ६ भरपूर प्रमाणात असते, त्यातील कॅल्शियम आणि ‘डी’ व्हिटॅमिनमुळे हाडांचे आरोग्य सुधारून ती बळकट होतात. शेंगदाण्यातून शरीराला मिळणारी स्निग्धता पोटाच्या तक्रारींवर फायदेशीर ठरते.

त्याच्या सेवनामुळे गॅस व अॅसिडिटीची समस्या देखील कमी होते. शेंगदाणे व गूळ खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते व रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते.

कच्चे शेंगदाणे भिजवून खाल्ले असता त्यातील पोषकतत्त्वे शरीर पूर्णत: शोषून घेते. त्यामुळेच उपवासाला मुद्दाम भिजलेल्या दाण्यांची उसळ केली जाते. शेंगदाण्यापासून उपवासाव्यतिरिक्त इतरही अनेक पदार्थ बनवले जातात. दाण्याची तिखट चटणी, गुडदाणी, चिक्की, खारे वा मसाला दाणे असे पदार्थ नेहमीच बनवले जातात. चिवडा, भडंग, पोहे, उपमा यांत दाणे घातल्याने ते चवदार होतात. या दाण्यापासून अतिशय चविष्ट असे पीनट बटर बनवले जाते. भुईमुगापासून तेल काढले जाते- जे चव आणि आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. अनेक घरांत रोजच्या स्वयंपाकात याच तेलाचा उपयोग केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Waterlogging : नालासोपारा पश्चिम परिसरात पूरसदृश स्थिती; आमदारांच्या कार्यालयातही शिरले पाणी

Horoscope: पुढच्या 48 तासांत बदलतीये ग्रह दशा! चमकणार 'या' 4 राशींचे नशीब; धनलाभासह मिळतील मोठ्या आनंदाच्या बातम्या

Harbhajan Singh याला NCA मधून का हाकललं होतं? २६ वर्षांनी स्वत:च केला मोठा खुलासा; म्हणाला, 'माझी चूक...'

Marathi News Live Updates : रस्ता खड्ड्यात; टोलवसुली मात्र जोरात! घोटी-पडघा टोल नाक्यावर वाहनचालकांचा संताप

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! पुढील २-३ तासात पावसाचा जोर वाढणार, आयएमडीचा इशारा

SCROLL FOR NEXT