Navratri 2023 Esakal
फूड

Navratri 2023 : नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंगदार साबुदाणा अप्पे! ही झटपट रेसिपी नक्की करा ट्राय

१० मिनिटांमध्ये होणारी ही झटपट रेसिपी नक्की करून बघा.

Monika Lonkar –Kumbhar

Navratri 2023 : नवरात्रौस्तवाला सर्वत्र सुरूवात झाली आहे. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये अनेक जण उपवास करतात. या ९ दिवसांमध्ये खिचडी, भगर सारखे नेहमीचे पदार्थ खायला नको वाटतं. काहीतरी चमचमीत आणि खमंग खाण्याची काहींची इच्छा असते.

साबुदाण्यापासून आपण अनेक उपवासाचे पदार्थ बनवू शकतो. ते सुद्धा झटपट होणारे. आज आपण साबुदाण्यापासून बनवले जाणारे आणि १० मिनिटांमध्ये होणारे साबुदाणा अप्पे कसे बनवयाचे? याची रेसिपी जाणून घेणार आहोत.

साबुदाण्याचे अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ बाऊल साबुदाणा

  • अर्धा बाऊल वरई

  • अर्धी वाटी दही

  • १ उकडलेला बटाटा (स्मॅश केलेला)

  • हिरव्या मिरच्या ४

  • जिरे

  • मीठ

अशा पद्धतीने बनवा साबुदाण्याचे अप्पे

  • सर्वात आधी एक बाऊल साबुदाणा (न भिजवलेला) आणि वरई एका पॅनमध्ये भाजून घ्या.

  • साबुदाना आणि वरई भाजून घेतल्यानंतर ते थंड व्हायला ठेवा.

  • थंड झालेला साबुदाणा आणि वरई मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या.

  • आता या दोन्हींचे पीठ एका भांड्यात काढा.

  • आता या पीठामध्ये स्मॅश केलेला बटाटा मिक्स करा आणि लागेल तस पाणी घाला.

  • हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतल्यानंतर त्यात दही, जिरे, हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ घाला.

  • यामध्ये थोड पाणी घालून हे सर्व घटक छान एकजीव करून घ्या.

  • आता हे सर्व एकत्र करून याचे छान अप्प्याचे बॅटर करून घ्या.

  • १० मिनिटांसाठी हे बॅटर झाकून ठेवा.

  • आता अप्पे पात्रामध्ये तेल लावून घ्या आणि हे बॅटर त्यात चमच्याने घाला. पीठ घातल्यानंतर त्यावर वरून १ चमचा तेल घाला. तेल घातल्यामुळे अप्पे लवकर उलटतील आता अप्पे बारीक गॅसवर शिजू द्या.

  • त्यानंतर, ते दुसऱ्या बाजूने पलटी करा. दोन्ही बाजूंनी छान अप्पे शिजू द्या. आता तुमचे उपवासाचे कुरकुरीत अप्पे तयार आहेत.

  • हे अप्पे तुम्ही उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election: एकनाथ शिंदेंच्या निवास्थानी मध्यरात्री मॅरेथॉन बैठक, काय ठरलं? महापालिका निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक!

Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीने राजधानीत साहित्य, संस्कृतीचा जागर; साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT