Navratri 2023 esakal
फूड

Navratri 2023 : नवरात्रीच्या दिवसांत लसूण कांदा न घालता बनवा या ४ टेस्टी भाज्या, बोटं चाखत राहाल

तुम्ही या ४ रेसिपीज ट्राय करू शकतात. या भाज्या खाऊन तुम्ही मसाल्याच्या भाज्यांची चव विसरून जाल

साक्षी राऊत

Navratri 2023 : नवरात्रीच्या उत्सवाची क्रेज सर्वत्र दिसून येते. भारताच्या अनेक भागांत हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. काहीजण या काळात नऊ दिवसांचे उपवास करतात. तर काही लोक पहिला दिवस आणि अष्टमीचा उपवास करण्याला प्राधान्य देतात. या दिवसांत बरेच लोक लसूण-कांदा खाणे कटाक्षाने टाळतात. अशावेळी तुम्ही या ४ रेसिपीज ट्राय करू शकतात. या भाज्या खाऊन तुम्ही मसाल्याच्या भाज्यांची चव विसरून जाल.

व्हेज करी

मिक्स भाजी तुम्ही लसूण-कांदा न घालता सहज बनवू शकता. ही बनवण्यासाठी मसाल्याची पेस्ट तयार करावी लागेल. यासाठी तुम्हाला केचप, गरम मसाला, धणे पावडर, हळद पावडर, आमचूर पावडर हे सगळे पाण्यात मिसळून त्याची बेस्ट बनवा. आता मिक्स व्हेज बनवताना टोमॅटोच्या पेस्टला तडका लावून मसाला पेस्ट तेलात बनवा. आणि भाज्या पाणी घालून शिजवून घ्या. तुमची टेस्टी भाजी बनून तयार असेल.

Navratri 2023

बटाट्याची भाजी

बटाट्याची भाजी बरेच लोक लसूण-कांदा न घालता खाणे पसंत करतात. त्यासाठी सगळ्यात आधी बटाटे उकळून घ्या. त्यानंतर थंड होऊ द्या. आता बटाट्याची साल काढून त्याचे छोटे छोटे काप करून घ्या. कढईत तेल गरम करा. गरम तेलात जिऱ्याचा तडका द्या. त्यात तमालपत्र, लवंग, काळे मीरे, दालचिनी घाला. जेव्हा मसाले व्यवस्थित भाजले जातील तेव्हा त्यात टोमॅटो घाला. सोबतच हळद, धणे पावडर घालून झाकून घ्या. आता पाणी आणि मीठ घालून थोड्या वेळ शिजण्यासाठी ठेवा. पाच मिनिटानंतर तुमची टेस्टी भाजी बनून तयार असेल.

Navratri 2023

पनीर भुर्जी

पनीर भुर्जी तुम्ही कांद्याशिवायही बनवू शकता. फक्त पनीर क्रंबल करून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करा आणि टोमॅटोची पेस्ट घालून भाजून घ्या. टोमॅटो शिजल्यानंतर त्यात हळद, हिरवी मिर्ची, आणि गरम मसाले घाला. चांगल्याप्रकारे भाजून घेतल्यानंतर त्यात पनीर घाला. नंतर मीठ घालून चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. सगळ्यात शेवटी त्यात टोमॅटो केचअप घाला. हे मसाले चवीला बॅलेंस करतात.

Navratri 2023

मसाला पनीर किंवा मसाला व्हेज

लसूण आणि कांद्याशिवाय तुम्ही दुसऱ्या पद्धतीच्या ग्रेव्हीत बऱ्याच भाज्या बनवू शकता. आता पॅनमध्ये तेल गरम करा आणि जिऱ्याचा तडका द्या. सोबतच हिरवी मिर्ची आणि आल्याचे तुकडे त्यात घाला. कसूरी मेथी घालून आता त्यात तयार पेस्ट घाला. तेलात पेस्ट चांगली शिजल्यानंतर लाल मिर्ची, मीठ आणि पाणी घालून शिजवा. सगळ्यात आधी पनीर किंवा शिजलेल्या भाज्या यात घालून मिक्स करा. तुमची टेस्टी मसाला करी तयार आहे. (Recipe)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT