Navratri 2023 esakal
फूड

Navratri 2023 : शाबुदाण्याची खीर अन् खिचडी खाल्लीच असेल, यंदा नवरात्रीच्या उपवसाला ट्राय करा एनर्जी देणारी ही बर्फी

तुम्हीही नऊ दिवस उपवास करणार असाल तर उपवासाला आज आपण वेगळी साबुदाणा बर्फीची रेसिपी जाणून घेणार आहोत

साक्षी राऊत

Navratri 2023 : 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे. नवरात्र हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे. या काळात देवी दुर्गेच्या ९ रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते. उपवास केले जातात. तुम्हीही नऊ दिवस उपवास करणार असाल तर उपवासाला आज आपण वेगळी साबुदाणा बर्फीची रेसिपी जाणून घेणार आहोत.

शिंगाड्याच्या पिठाव्यतिरिक्त, उपवासात सर्वात जास्त वापरली जाणारी दुसरी गोष्ट म्हणजे शाबुदाणा. मात्र शाबुदाणा खिचडी आणि खीर व्यतिरिक्त शाबुदाण्यापासून अनेक पदार्थ बनवले जाऊ शकतात. आज आपण शाबुदाण्यापासून बर्फी तयार करूयात. जे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि उपवासाच्या वेळी वारंवार लागणारी भूकही नियंत्रणात ठेवता येते. चला तर जाणून घेऊया झटपट बनणारी ही रेसिपी.

शाबुदाणा बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

शाबुदाणा - १ बाउल

साखर - २ चमचे

दूध - २ चमचे

तूप - १ चमचा

खोबऱ्याचा किस - १ चमचा

विलायची पावडर - १/२ चमचा

काजू - १ चमचा काजू

पिस्ता

अशी बनवा शाबुदाणा बर्फी

  • सगळ्यात आधी शाबुदाणा भाजून घ्या. हा शाबुदाणा तेल किंवा तूपाशिवाय भाजू नका.

  • शाबुदाणा चांगल्याप्रकारे भाजल्यानंतर थंड होऊ द्या.

  • आता यानंतर शाबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

  • बर्फीसाठी साखरेचीसुद्धा पावडर वापरा.

  • आता एका बाउलमध्ये शाबुदाणा पावडर, साखरेची पावडर, मिल्क पावडर, खोबऱ्याचा किस घालून चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या.

  • यात विलायची पावडरसुद्धा घाला. तुम्ही मिल्क पावडर आणि दूधाऐवजी कोकोनट किंवा बदाम मिल्कसुद्धा यूज करू शकता.

  • एका प्लेटमध्ये तूप लावून आता हे मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. थोड्या वेळी सेट होऊ द्या.

  • १०-१५ मिनिटांनी चाकूच्या मदतीने बर्फी आकारात कापून घ्या. आता वरून कापलेले ड्राय फ्रुट्स त्यावर घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांचं राज्य! ODI World Cup मध्ये दिसणार बदलाचे वारे; ICC च्या ऐतिहासिक निर्णयाचे जगभरातुन कौतुक

Panchayat Raj : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’; गावाच्या विकासासाठी आता मोठी संधी!

Latest Marathi News Updates Live : इचलकरंजीत पाणी प्रश्नावर महाविकास आघाडी आक्रमक

Kalyani Komkar Statement: वनराजच्या डेड बॉडीवर हात ठेवून सांगितलं होतं... आयुष कोमकरच्या आईने काय सांगितलं? Exclusive माहिती

Chhagan Bhujbal: नातेवाईक की नातेसंबंध? दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे; भुजबळांनी सगळं उलगडून सांगितलं

SCROLL FOR NEXT