High-Protein Indian Breakfast Without Bread | Moong Dal Sandwich sakal
फूड

No Bread High-Protein Sandwich: वीकेंडला हाय प्रोटीन ब्रेकफास्ट हवाय? मग ही नो-ब्रेड ‘मूग डाळ सँडविच’ रेसिपी तुमच्यासाठीच

High-Protein Indian Breakfast Without Bread: ब्रेडशिवाय बनवलेलं, प्रोटीननं भरलेलं मूग डाळ सँडविच – चव, पौष्टिकता आणि सोपी कृती एकाच रेसिपीत!

Anushka Tapshalkar

Weekend Special Protein Breakfast Ideas: वीकेंडला कुटुंबातील सगळेच घरी असतात. अशावेळी काहीतरी हेल्दी आणि टेस्टी बनवायला सगळ्यांनाच आवडतं. तुम्ही ही ब्रेकफास्टसाठी काही हेल्दी आणि पोटभर खाण्याची रेसिपी शोधताय? मग ही मूग डाळीपासून तयार होणारी सँडविच रेसिपी नक्की ट्राय करा. विशेष म्हणजे यामध्ये ब्रेडचा वापर न करता उच्च प्रोटीनयुक्त घटक वापरले आहेत. त्यामुळे ही रेसिपी स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठी देखील उत्तम आहे.

साहित्य

  • मूग डाळ – 1 कप (2-3 तास भिजवलेली)

  • आले – 1 इंच

  • हिरवी मिरची – 1

  • हळद – 1/4 टीस्पून

  • मीठ – चवीनुसार

  • बेकिंग पावडर – 1/4 टीस्पून

  • किसलेलं पनीर – 1/2 कप

  • किसलेलं गाजर – 1/4 कप

  • हिरवी चटणी

  • काकडी, टोमॅटो, कांदा (स्लाइस केलेले)

  • चाट मसाला

कृती

  1. भिजवलेली मूग डाळ मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि आले घालून बारीक वाटून घ्या.

  2. हे पीठ एका बोलमध्ये घेऊन त्यात हळद, मीठ, किसलेलं पनीर आणि गाजर मिसळा.

  3. शेवटी बेकिंग पावडर घालून नीट फेटा.

  4. हा तयार मिश्रण सँडविच ग्रिलरमध्ये दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. ग्रिलर नसेल, तर हेच पीठ तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

  5. शिजलेल्या तुकड्यांमध्ये हिरवी चटणी लावा, त्यावर काकडी, टोमॅटो आणि कांद्याचे स्लाइस ठेवा. चाट मसाला भुरभुरवा आणि सँडविच तयार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

...तोपर्यंत नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, बाळ्या मामांचा सरकारला इशारा, नेमकी अट कोणती?

Latest Marathi News Updates Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Asia Cup 2025: 'बुमराह जर UAE विरुद्ध खेळला, तर आंदोलन करेल', माजी भारतीय क्रिकेटपटूने कंल जाहीर

Yermala Crime : राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या वाहन लुटीच्या व्हायरल व्हिडीओ नंतर, स्थानिक गुन्हे शाखेला जाग

SCROLL FOR NEXT