Kanji Recipe
Kanji Recipe  esakal
फूड

Kanji Recipe : ट्राय करा उत्तर भारतीय स्टाइल कांजी; शरीराला आहे खूप फायदेमंद

सकाळ डिजिटल टीम

Kanji Recipe : उत्तर भारतातली एक खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी म्हणजे कांजी. आपण या गाजर आणि बिटाच सूप सुद्धा म्हणू शकतात. हे गाजर आणि बीटपासून बनवल जात. ही कांजी खासकरून त्याच्या स्वाद आणि रंगामुळे अधिकच आकर्षक वाटते. तडका देताना वापरण्यात येणारी मोहरी या पेयामध्ये टाकल्यामुळे त्याला एक वेगळीच रंगत येते. आणि मुळात गाजर आणि बीट वापरत असल्यामुळे हे आरोग्यदायी आणि चवीला भारी असलेलं पेय आहे. चला बघुया याची रेसिपी

साहित्य

3-4 गाजर

3-4 बीट

3 लिटर पाणी

आवश्यकतेनुसार मोहरी पावडर

आवश्यकतेनुसार काळे मीठ

आवश्यकतेनुसार मीठ

आवश्यकतेनुसार रेड चिली पावडर

कृती

Step 1: गाजराचे लहान लहान तुकडे करून घ्या, त्यातला पिवळा भाग काढून टाका.

Step 2: एका बीटाची साल काढून त्याचेही लांब आणि पातळ काप करून घ्या.

Step 3: एका मोठ्या काचेच्या बरणीत 3 लीटर पाणी घेऊन त्यामध्ये गाजराचे तुकडे, बीट, 1 चमचा मीठ, 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे बारीक कुटलेली मोहरी घालून सर्व सामग्री व्यवस्थित ढवळून मिक्स करा.

Step 4: बरणी एका पातळ कपड्याने झाकून त्यावर बारीक छिद्रे असलेली जाळी लावून घ्या आणि हे पेय 4 ते 5 दिवस दररोज चमच्याने दिवसातून एकदा ढवळा.

Step 5: पेय चांगली मिक्स होण्यासाठी तुम्ही ही बरणी 2 ते 3 दिवस सुर्यप्रकाशात ठेऊ शकता. तयार झालाय आपला स्वादिष्ट आणि हेल्दी गाजर आणि बीटचा ज्यूस!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

SCROLL FOR NEXT