फूड

Food Tips : घरच्या घरी तयार करा कांद्याची मसालेदार भाजी

नीलेश डाखोरे

नागपूर : कांदा हा प्रत्येकाच्या घरी असतो. कांद्याशिवाय कोणतीही भाजी अशक्य आहे. एकूणच कांद्याची फोडणी दिल्याशिवाय भाजीच होत नाही. कांद्यापासून आपण कांदा भजे, डाळ कांदा, कांद्याची चटणी आदी प्रकार बनवत असाल? आज आपण कांद्याची भाजी कशी तयार करायची हे पाहूया... (onion-sabji-recipe-Foo-News-recipe-tips-Spicy-vegetables-onion-nad86)

पावसाळ्याच्या दिवसांत अनेकांना चवदार आणि मसालेदार खायला आवडते. या दिवसांत अनेकजण हिरव्या भाज्याऐवजी मसालेदार पदार्थ खाणे पसंत करतात. पाऊस पडत असताना कांदा भजे खाण्याचा आनंद वेगळाच असतो. या दिवसांत हिरव्या भाज्याऐवजी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर कांद्याची मसालेदार भाजी बनवू शकता.

घरात कांद्याची ही रेसिपी नक्कीच करून पहा. मुले तसेच प्रौढांनाही या भाजीची चव आवडेल. तर मसालेदार कांदा करी बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि ते कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत...

लागणारी सामग्री

दोन टी स्पून तेल, एक टी स्पून जिरे, अर्धा टी स्पून जिरे, आठ ते दहा कढीपत्ता, आल, आठ ते नऊ लसुणाच्या कळ्या, तीन हिरव्या मिरच्या, चार कांदा, मीठ, अर्धा टी स्पून हळद, एक टी स्पून धणे पावडर, अर्धा टी स्पून लाल तिखट, एक वाटी टोमॅटो पुरी, दोन टी स्पून दही व गरम मसाला.

अशी करा तयार

कांदा सोलल्यानंतर धुवा आणि कापून घ्या. यानंतर कांद्याचे तुकडे प्लेटमध्ये ठेवा. आले, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट तयार करा. आता गॅसवर कढई ठेवून तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे आणि मोहरी टाका. तेलामध्ये दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे फोडू द्या. त्यानंतर कढीपत्ता टाका.

एक मिनिटानंतर त्यात आले, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाका. हे मिश्रण चांगल्याप्रकारे ढवळल्यानंतर कांदा मिक्स करा. कांदा दोन मिनिट फ्राय करा. कांदा किंचित मऊ झाला की त्यात हळद, लाल तिखट आणि धणे पूड टाका. आता कढई झाकून ठेवा आणि सुमारे दोन मिनिटे शिजवा. दोन मिनिटानंतर प्लेट काढून टाका आणि टोमॅटो प्युरी मिसळा. तसेच मीठही टाका.

टोमॅटो टाकल्यानंतर पॅनला प्लेटने झाकून ठेवा आणि चार ते पाच मिनिट शिजू द्या. पाच मिनिटानंतर प्लेट काढून त्यात दही आणि गरम मसाला टाका. आता हे चमच्याने चांगले मिसळा. दोन मिनिटे ढवळत असताना शिजवा. काही वेळाने गॅस बंद करा. अशा प्रकारे कांद्याची भाजी तयार होईल. ही भाजी पराठे किंवा पोळी बरोबर सर्व्ह करता येईल.

(onion-sabji-recipe-Foo-News-recipe-tips-Spicy-vegetables-onion-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Students Food Poison : पुण्यात एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप

Mumbai Pollution: अत्‍याधुनिक वाहने धूळ रोखणार, अनुभवी अभियांत्रिकी संस्था, कंपन्यांकडून मागवले अर्ज

Latest Marathi News Live Update : चिपळूण मध्ये पक्षविरोधी काम करणाऱ्या बड्या पदाधिकाऱ्यांना भाजपचा दणका

Mumbai Vanrani: नॅशनल पार्कमधील वनराणीला पसंती, महिनाभरात ९,००० जणांची भेट; ७.५० लाखांचे उत्पन्न 

Pune District Politics: भोरमध्ये दांपत्य प्रथमच एकाच वेळी सदस्य; राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड जिल्हा परिषदेला, तर तृप्ती खुटवड पंचायत समितीला विजयी!

SCROLL FOR NEXT