Paneer Bread Roll Esakal
फूड

Paneer Bread Roll: घराच्या घरी बनवा हेल्दी, टेस्टी ‘पनीर ब्रेड रोल

कुरकुरीत ब्रेडसोबत पनीरच्या सॉफ्टनेसने स्नॅक्सच्या चवीला एक वेगळा तडका देऊ शकता.

सकाळ डिजिटल टीम

लहांनापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना स्नॅक्समध्ये काहीतरी नवीन खाण्याची हौस असते. बहुतेक लोकं ब्रेकफस्टमध्ये ब्रेडचा वापर करतात. अशावेळी तुम्ही कुरकुरीत ब्रेडसोबत पनीरच्या सॉफ्टनेसने स्नॅक्सच्या चवीला एक वेगळा तडका देऊ शकता. अगदी झटपट पद्धतीने तुम्ही पनीर ब्रेड रोल्स बनवू शकता. यासाठी ब्राऊन ब्रेडचाही वापर करता येईल. पनीर ब्रेड रोल बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

सहा ब्रेड

एक कप पनीर (किसलेले)

एक चमचा आले-लसूण पेस्ट

लाल तिखट

गरम मसाला

चाट मसाला

टोमॅटो सॉस

कोथिंबीर

चवीनुसार मीठ

बटर

कृती:

पनीर ब्रेड रोल बनवण्यासाठी प्रथम ब्रेड घ्या आणि त्याची काट काढून घ्यावे. एका भांड्यात पनीर, आले-लसूण पेस्ट, बटर, सर्व मसाले आणि सॉस मिक्स करा. ब्रेडवर हलके पाणी लावून तयार केलेला पनीर मसाला भांड्यात भरा.

हलके पाणी लावून ब्रेडला रोलचा आकार द्यावे.आता तेल गरम करा आणि तयार रोल मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळावे.चविष्ट पनीर ब्रेड रोल तयार आहेत, चहा किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai CID Raid Kolhapur : मुंबई सीआयडीची कोल्हापुरात मोठी कारवाई अचानक इस्माईल, दस्तगीर या सख्या भावांना उचललं, कोट्यावधींचा घोटाळा...

Pan Card : तुमचा PAN नंबर रँडम नाही! प्रत्येक अक्षरात लपले आहे तुमचं गुपित; जाणून घ्या काय अर्थ आहे

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार श्रेयस तळपदेची एंट्री ? "लोक लक्ष वेधून घेण्यासाठी.."

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंनंतर महायुतीची सभा होणार, चार पक्षांनी मागितलेल्या तारखा; अखेर BMCने काढला तोडगा

SCROLL FOR NEXT