Paneer Samosa Esakal
फूड

Paneer Samosa recipe: घरच्या घरी कसा तयार करायचा पनीर समोसे?

इ. स. 1300 च्या सुमारास कवी आमीर खुसरो यांनी समोसा या खाद्यपदार्थाचा उल्लेख केलेला आढळतो.

दिपाली सुसर

इराणमध्ये समोशाला सम्सा किंवा सेनबोगास असे म्हटले जाते. तेथून तो दिल्लीत मुघलांचे राज्य असताना भारतात आला आणि सगळ्यांच्या चवीत बसला. आज भारताच्या प्रत्येक प्रातांत समोसा हा प्रकार मिळतो. साधरणपणे तेराव्या शतकात इराणमधल्या आचाऱ्यांनी तो तयार केला असावा. इ. स. 1300 च्या सुमारास कवी आमीर खुसरो यांनी समोसा या खाद्यपदार्थाचा उल्लेख केलेला आढळतो.

आजच्या लेखात आपण पनीर समोसे घरच्या घरी कसे तयार करायचे याची रेसिपी बघणार आहोत.

साहित्य:

● एक वाटी बारीक खिसलेले पनीर

● एक बारीक चिरलेला कांदा

● एक चमचा लाल तिखट

● अर्धा लिंबाचा रस

● मीठ

● एक वाटी मैदा

● एक बारीक चिरलेली हिरवी मिरची

● अर्धा चमचा जिरे

● बटर

● समोसे तळायला तेल

पनीर समोसे कसे तयार करायचे?

सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा, बटर आणि मीठ घ्या. नंतर हे पीठ छान मिक्स करून मळून घ्या. पीठ मळतांंना ते थोडे घट्ट असे मळावे. आता पीठ मळून घेतल्यानंतर ओल्या सुती कापडाने थोडा वेळ झाकून ठेवावे.

आता लोखंडी कढईत थोडेसे तेल मध्यम आचेवर गरम करावे. जिरे घालून फोडणी दयावी. नंतर त्यात कांदे, हिरव्या मिरच्या घालून एक-दोन मिनिटे परतून घ्यावे.

त्यात लाल तिखट, लिंबाचा रस, मीठ आणि खिसलेला पनीर घालावा. हे मिश्रण चांगले एकजीव मिसळून आणि दोन मिनिट शिजू द्यावे.

आता समोसा बनवण्यासाठी पिठाचे छोटे गोळे तयार करावे आणि पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्याच्या लहान पुर्‍यांमध्ये लाटून घ्याव्या. चाकूच्या मदतीने त्या लहान पुऱ्या अर्धे कापून घ्याव्या. नंतर अर्धी पुरी घेऊन आणि तळहाताच्या काठाचा वापर करून शंकूचा आकार द्या. या पनीरच्या मिश्रणात एक किंवा दोन चमचे भरावे. किंचित पाण्याने दुमडून कडा बंद करा. हीच प्रक्रिया इतर समोशांसोबतही करावे.

नंतर लोखंडी कढईत तेल गरम करून कढईत समोसे काळजीपूर्वक ठेवा आणि मध्यम-उच्च आचेवर तळून घ्यावे. समोसे गोल्डन ब्राऊन झाल्यावर बाहेर काढा.

अशा रितीने घरच्या घरी पनीर समोसे तयार आहे हे समोसे तुम्ही गोड आंबट चटणीसोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT