Peanuts Chutney Recipe esakal
फूड

Peanuts Chutney Recipe : डोसा इडलीची चव वाढवणारी आंध्र प्रदेश स्टाईल शेंगदाण्याची खास चटणी

चला तर आज आपण हटके आणि टेस्टी अशी इडलीसह खाल्ली जाणारी आंध्रप्रदेश स्टाइल शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते जाणून घेऊया

साक्षी राऊत

Peanuts Chutney Recipe : इडलीसह आपण सांभर किंवा खोबऱ्याची किंवा चणा दाळीची चटणी खाल्लीच असेल. मात्र इडली आणि डोस्याची चव वाढवणारी आंध्र प्रदेश स्टाइल चटणी तुम्ही कधी ट्राय केलीत का? चला तर आज आपण हटके आणि टेस्टी अशी इडलीसह खाल्ली जाणारी आंध्रप्रदेश स्टाइल शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते जाणून घेऊया.

आंध्र स्टाइल चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ मोठा चमचा तेल

१ कप शेंगदाणे

४-५ कोरड्या लाल मिर्च्या

१ इंच आल्याचा कापलेला तुकडा

५-६ लसणाच्या कळ्या

जाड कापलेला पाव कप कांदा

चिंच

चवीनुसार मीठ

चटणीच्या तडक्यासाठी लागणारे साहित्य

२ मोठे चमचे तेल

१ चमचा मोहरी

अर्धा चमचा जीरे

अर्धा चमचा हींग

१ चमचा उडीद डाळ

१०-१२ कडीपत्त्याची पानं

आंध्र प्रदेश स्टाइल शेंगदाण्याची चटणी बनवण्याची पद्धत

आंध्र प्रदेश स्टाइल चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये रिफाइंड तेल गरम करून घ्या. आता तेलात शेंगदाणे घालून हलके भाजून घ्या त्यानंतर एका प्लेटमध्ये वेगळे काढून घ्या. आता पॅनमध्ये लाल मिर्ची, आलं, लसूण आणि कांदा घालून ३-४ मिनिटे भाजा. त्यानंतर आता सगळ्या वस्तू शेंगदाण्यासह एका प्लेटमध्ये थंड होऊ द्या.

आता या गोष्टी चिंच आणि मिठासह मिक्सरमधून बारीक करून घ्या. बारीक करताना त्यात थोडे पाणी घाला. आता चटणीला तडका लावण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे आणि हींग घालून काही सेकंद तडकवा. त्यात उडीद डाळ घालून सोनेरी होतपर्यंत भाजा. नंतर चटणीवर तडका आणि कडीपत्ता टाका. आता तुम्ही ही चटणी इडली किंवा डाळ-भातासहसुद्धा सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT