Rajma Chaat Recipe esakal
फूड

Rajma Chaat Recipe : प्रोटिनयुक्त नाश्त्यासाठी नक्की ट्राय करा ‘ही’ राजमा चाट रेसिपी

राजम्यामध्ये पोषकघटकांचे जास्त प्रमाण आढळून येते.

Monika Lonkar –Kumbhar

Rajma Chaat Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज काय बनवावे? असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो. हेल्दी नाश्ता असेल तर मग दिवसभर आपल्याला एनर्जेटिक राहण्यास मदत होते. पोहे, उपमा, पराठा हे नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो.

त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला खास नाश्त्यासाठी झटपट होणारी आणि प्रोटिनयुक्त असलेली राजमा चाटची रेसिपी सांगणार आहोत. ही प्रोटिनयुक्त राजमा चाटची रेसिपी आकर्षक आणि चवदार आहे. ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात राजमा चाटची हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी

राजमा चाटची रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • २ कप उकडलेले राजमा

  • २-३ कप उकडलेले बटाटे

  • अर्धा कप उकडलेले चणे(हरभरे)

  • हिरवी कोथिंबीर चिरलेली

  • ताजी काळी मिरी

  • २ कांदे

  • ४ ते ५ हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या

  • टोमॅटो १

  • १ लिंबू

  • चाट मसाला

  • काळे मीठ

  • चवीनुसार मीठ

राजमा चाट बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • राजमा चाटची हेल्दी रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी राजमा आणि हरभरे स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून ठेवावे लागतील.

  • त्यानंतर, तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी चाट बनवू शकता.

  • दुसऱ्या दिवशी सकाळी कुकरमध्ये पाणी घालून राजमा, हरभरे आणि बटाटे लावा आणि कुकरला ४-५ शिट्ट्या काढा.

  • नंतर, हे सर्व थंड होण्यासाठी बाहेर एका भांड्यात काढून ठेवा.

  • आता दुसऱ्या एका भांड्यात कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरचीचे तुकडे एकत्र करून घ्या.

  • त्यानंतर, उकडलेले बटाटे चांगल्या प्रकारे सोलून घ्या आणित त्याचे तुकडे करा.

  • तुम्हाला हवे असल्यास राजमा आणि हरभरे तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता किंवा वाटीमध्ये पूर्ण तसेच ठेवू शकता.

  • आता कांदा-टोमॅटोमध्ये सर्व काही चांगल्या प्रकारे मिसळा.

  • त्यानंतर, त्यामध्ये चाट मसाला, तिखट(हवे असल्यास) काळे मीठ,चाट मसाला आणि चवीनुसार साधे मीठ घालून छान मिक्स करा.

  • त्यावर आता हिरवी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून गार्निश करा. आता तुमचा प्रोटिनयुक्त राजमा चाट तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT