Rava Batata Puri Recipe esakal
फूड

Rava Batata Puri Recipe : पुरी खायला आवडते? पण कधी रवा बटाटा पुरी ट्राय केली आहे का?

रवा बटाटा पुरी ही नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी एक उत्तम पर्याय

सकाळ डिजिटल टीम

Rava Batata Puri Recipe : आपण सतत काहीना काही नवनवीन रेसिपी ट्राय करत असतो, त्यात पुऱ्यांमध्ये तर नवनवीन प्रकार खायला घरात सगळ्यांनाच आवडतात. पुऱ्यांची अशीच एक हटके रेसिपी म्हणजे रवा बटाटा पुरी.

रवा बटाटा पुरी ही नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे; सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही पुरी सर्वांनाच फार आवडते त्यासोबत लोणच, चटणी किंवा सॉस सोबत ही पुरी अजून लागते.

साहित्य

4 उकडलेले बटाटे

1 वाटी बारीक रवा भीजवून

2 वाटी गव्हाचे पीठ

1 1/2 टेबलस्पून लाल तिखट, लसूण, जीरे , मीठ

1 टीस्पून ओवा

1 टीस्पून धणेपूड

1 टीस्पून मीठ

1 टीस्पून हळद

250 ग्राम तेल तळण्यासाठी

कृती:

स्टेप 1

उकडलेले बटाटे सोलून एका मोठ्या बाऊलमध्ये मॅशरने मॅश करून घ्या. एका बाऊलमध्ये रवा घ्या.

स्टेप 2

रव्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून रवा पाच मिनिटांसाठी भिजवून ठेवा. मॅश केलेला बटाट्यामध्ये भिजवलेला रवा टाका.

स्टेप 3

रवा आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये तिखट, लसूण, जीरेचा ठेचून टाका. ओवा, धणे पूड आणि मीठ टाका.

स्टेप 4

मिश्रण चांगले मिक्स करून घ्या आणि त्यातून घट्ट गोळा तयार करण्यासाठी कणिक टाका, पाणी घालू नका, तेलाचा हात लावून घट्ट गोळा भिजवून घ्या.

स्टेप 5

भिजवलेले पीठ पाच मिनिटे झाकून ठेवा नंतर त्याची एक साधारण जाडीच्या घट्ट पुऱ्या लाटून घ्या.

स्टेप 6

गॅस वर तेल गरम करून घ्या नंतर त्यात पुरी टाकून साधारण लाल सर पुर्‍या तळून घ्या. चटणीसोबत गरम गरम रवा बटाट्याची पुरी सर्व करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT