फूड

तोंडाला चव येईल! मिश्र डाळींच्या पाट वड्यांची रेसिपी एकदा करून पहा

सकाऴ वृत्तसेवा

पुणे: अनेकांना रोज तेच तेच जेवण बनवून आणि खाऊन कंटाळा येतो. अशावेळी वेगळं काहीतरी बनवून खाण्याची इच्छा होते. अशावेळी काय बनवावे याच विचारात अनेकजण बसून राहतात. चला एक सोपी आणि घरगुती रेसिपी जाणून घेऊयात. जी तुम्हाला वेगळी चव मिळेल. त्या डिश च नाव आहे मिश्र डाळीच्या पाट वड्या. चला जाणून घेऊयात त्याची रेसिपी.

साहित्य:

- हरभरा डाळ - १/२ वाटी

- मूग डाळ - १/२ वाटी

- तूर डाळ - १/४ वाटी

- खोबरे खीस - ४ चमचे

- बारीक चिरलेली कोथिंबीर - १ मूठभर

- मोहरी, जिरे, हिंग, हळद - फोडणी पुरते

- वाटलेली हिरवी मिरची - चवीनुसार (४-५ मिरच्या पुरेश्या होतात)

- तेल - २ मोठे चमचे

- मीठ - चवीनुसार

- साखर - १ छोटा चमचा

- खसखस - १ चमचा

कृती:

- सर्व डाळी सुमारे ३ तास भिजत घालून सरबरीत वाटून घ्याव्यात. त्यात मीठ, साखर, मिरची मिसळावे.

- पातेल्यात तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळदीची फोडणी करावी.

- आवडत असल्यास ४-५ पाने कढीपत्ता घालावा.

- या फोडणीवर वाटलेल्या डाळींचा गोळा घालून एकजीव करून वाफवून घ्यावा.

- ताटाला थोडे तेल लावून त्यावर वाफवलेल्या डाळींचा गोळा हाताला थोडे पाणी लावून गरम असतानाच थापावा.

- वरून खसखस, खोबरे खीस, कोथिंबीर घालावी.

- थोडे गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT