Lal Bhoplyache Bharit
Lal Bhoplyache Bharit Esakal
फूड

Recipe: बहुगुणी लाल भोपळ्याचं चवदार भरीत कस करायचं ?

दिपाली सुसर

Lal Bhoplyache Bharit: हिवाळ्यात लाल भोपळा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो. लाल भोपळ्याचा वापर भाजी, सांबर, पुऱ्या, पछडीमध्ये केला जातो. चवीला उत्कृष्ठ असलेला लाल भोपळा पचायला हलका असल्यामुळे या भाजीला पथ्याची भाजी असंही म्हणतात. आजारपणापासून दूर राहण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी आहारात भोपळ्याचा समावेश असणं फायद्याचं ठरू शकतं.भोपळ्यामध्ये असलेले पोषक घटक ह्रदयाच्या आरोग्यासाठीदेखील उत्तम असतात. भोपळ्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत होते. ज्यामुळे ह्रदयविकाराचा धोका कमी होतो. आजकाल प्रदूषित वातावरणामुळे अस्थमाची समस्या वाढताना दिसत आहे. तुम्हाला जर अस्थमाचा, दम्याचा त्रास असेल तर तुम्ही नियमित लाल भोपळ्याचे सेवन करायला हवे. कारण लाल भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमच्या श्वसनमार्गाचे इनफेक्शनपासून संरक्षण होते. अस्थमा अटॅक टाळण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.आजच्या लेखात आपण लाल भोपळ्याचं भरीत कस करायचं याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य:

दोन वाटी लाल भोपळ्याच्या मध्यम फोडी (साल काढून)

अर्धा चमचा तूप

जिरे

मोहरी

तिन हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून

कोथिंबीर

दही

चवीनुसार मिठ

शेंगदाण्याचा कूट

साखर

कृती:

भोपळ्याच्या फोडी कूकरमध्ये उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर चमच्याने मॅश करून घ्याव्यात. खुप गुठळ्या राहू देवू नये. लहान कढल्यात तूप गरम करावे. तूप गरम झाले कि जिरे आणि मिरच्या घालून फोडणी करून उकडलेल्या भोपळ्यात घालावी. चवीनुसार मिठ आणि किंचीत साखर घालावी.नंतर शेंगदाण्याचा कूट, दही आणि कोथिंबीर घालून निट मिक्स करावे. अशा रितीने आपले भरीत तयार झाले आहे. हे भरीत उपवासालाही चालते. उपवासाव्यतिरिक्त दिवशी फोडणीत हळद, हिंग, मोहोरी घातली तरी चालते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT