banana kachori Esakal
फूड

Recipe: घरच्या घरी कशी तयार करायची केळीची कचोरी?

आता परतीचा पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते.

सकाळ डिजिटल टीम

आता परतीचा पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते. नेहमीच्या भजे, समोसा, कचोरीचा कंटाळा आला असेल तर ट्राय करुन पहा ही टेस्टी कच्च्या केळीची कचोरी.

साहित्य

चार मोठी कच्ची केळी

तिन चमचे तांदळाचे पीठ

चवीनुसार मीठ

एक चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट

चार चमचे शेंगदाण्याचा कुट

एक चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट

एक कप ताजे खोबरे (किसलेले)

कढीपत्ता (बारीक चिरून)

दोन चमचे पांढरे तीळ (भाजलेले)

चवीनुसार मीठ

दोन चमचे साखर

 जिरे

एक चमचा लिंबाचा रस

दोन चमचे कोथिंबीर

तेल (तळण्यासाठी)

दही डिप तयार करण्यासाठी

100 ग्रॅम दही

चवीनुसार मीठ

दोन चमचे साखर

कचोरीचा वरचा भाग तयार करण्यासाठी प्रथम कच्चा केळी उकळला आणि मॅश करून घ्यावे. यानंतर एका भांड्यात मॅश केलेली कच्ची केळी टाका आणि त्यात तांदळाचे पीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ आणि एक छोटा चमचा तेल एकत्र करा आणि बाजूला ठेवा.

कचोरीचे सारण किंवा स्टफिंग तयार करण्यासाठी प्रथम एका भांड्यात किसलेले खोबरे, हिरव्या मिरचीची पेस्ट, भाजलेले आणि बारीक केलेले शेंगदाणे, भाजलेले पांढरे तीळ, जिरे, कढीपत्ता, साखर, लिंबाचा रस, मीठ आणि कोथिंबीर मिक्स करा. तुमचे स्टफिंग तयार आहे.

कचोरी कशी तयार करावी?

आता कच्च्या केळ्याचे मिश्रण घेऊन त्याचे गोल गोळे बनवा. हाताला थोडे तेल लावून बॉलला वाटीच्या आकारात सपाट करा. तयार फिलिंग मटेरियल मध्यभागी ठेवा. तो बंद करून गोल गोळा बनवा. वर तांदळाचे पीठ लावून बाजूला ठेवा. त्याचप्रमाणे उरलेल्या कचोऱ्या तयार करा. एका खोलगट कढईत तेल टाकून गरम करा. तयार कचोऱ्या मंद आचेवर तळून घ्या. सोनेरी रंग आल्यावर काढून टिश्यु पेपरवर ठेवा. सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.

दही डिप तयार करण्यासाठी काय करावे?

दही डिप तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात फेटलेले दही घ्या. त्यात भाजलेले व बारीक केलेले शेंगदाणे, मीठ, साखर, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि डाळिंबाचे दाणे घालून मिक्स करा. तयार दही डिप कचोरी सोबत सर्व्ह करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT