vegetable cheese chili Esakal
फूड

Recipe: हेल्दी व्हेजिटेबल चीझ चीला कसा तयार करायचा ?

चीला चांगला शिजल्यावर वर चीज किसून टाकावे आणि चीज वितळेपर्यंत भाजून घ्यावे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक आईची तक्रार असते आमची मुल व्हेजिटेबल खातचं नाही अशाच आयासाठी आजची रेसिपी खास आहे.तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना व्हेजिटेबल खाऊ घालु शकता. व्हेजिटेबल चीझ चीला बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य

एक वाटी बेसन

दोन बारीक चिरलेले कांदे 

दोन  बारीक चिरलेले टोमॅटो 

एक बारीक चिरलेली शिमला मिरची 

एक मध्यम आकाराचे किसलेले गाजर

अर्धा वाटी वाटाणे

चीज 

लाल तिखट

काळी मिरी

अजवाइन 

तेल

मीठ

कृती:

व्हेजिटेबल चीज चीला बनवण्यासाठी  सर्वप्रथम कांदा, टोमॅटो, सिमला मिरचीचे बारीक तुकडे करून घ्यावे. यानंतर गाजर किसून झाल्यावर मटार बारीक वाटून घ्यावे.

आता एक मिक्सिंग भांडे घ्यावे आणि त्यात बेसनची वाटी घालावा. यानंतर लाल तिखट, कॅरम सीड्स, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण चांगले मिक्स करावे.

यानंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, टोमॅटो घाला आणि थोडे पाणी घालून बेसन आणि भाज्यांचे पीठ तयार करावे. हे लक्षात ठेवा की पीठ बेसनासारखेच तयार करावे लागेल.पीठात गुठळ्या ठेवू नये.

आता तवा घ्यावा आणि मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं तेल टाकून सगळीकडे पसरवा. आता एका भांड्यात बेसन पिठात घ्यावे आणि पॅनच्या मध्यभागी वर्तुळाकार हालचाली करा. नंतर ते पलटून चीजचा रंग दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. चीला चांगला शिजल्यावर वर चीज किसून टाकावे आणि चीज वितळेपर्यंत भाजून घ्यावे. यानंतर चीला घडी करून प्लेटमध्ये काढावा. अशारितीने व्हेजिटेबल चीज चीला तयार आहे हा चीला तुम्ही दही, चटणी यासोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar industry: साखर कोणी खाईना, खपात घसरण; मार्चचा ५० टक्के कोटा पडून; एप्रिलमध्येही विक्रीचे ‘चॅलेंज’, उद्योगासमोर दुहेरी संकट!

Vidarbha News:शासकीय कार्यालये की मृत्यूचे सापळे? ; ९५ टक्के इमारती धोकादायक; कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ

Vidarbha News: रस्त्यांची दयनीय स्थिती; विकासकामांसाठी प्रतीक्षाच; हलबीटोला मार्गासह मुख्य रस्ते जीर्ण; अपघाताचा धोका वाढला

Amravati News: सेंट्रल बँकेत तीन कोटींचा अपहार; न केलेल्या कामाचे देयके काढून पैसा खिशात

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं! दोन एकर जमिनीसाठी सख्ख्या भावासह वडिलांचा कुऱ्हाड-खोऱ्याने खून; हिंगणगावात विहिरीशेजारी नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT