Rajasthani special gatta sabji Esakal
फूड

Recipe: राजस्थानी स्पेशल गट्ट्याची भाजी कशी तयार करायची?

गट्ट्याची भाजी हा एक अस्सल राजस्थानी पदार्थ आहे.

दिपाली सुसर

गट्ट्याची भाजी ही एक अस्सल राजस्थानी डिश आहे जिने खूप कमी काळात आपल्या स्वादिष्टपणामुळे देशातल्या विविध प्रातांत लोकप्रियता मिळविली आहे. ही गट्टयाची भाजी तयार करण्यासाठी गट्टे एकतर तेलात तळून किंवा पाण्यात उकडवून हे भाजी तयार केली जाते. घरातल्या सगळ्या भाज्या जेव्हा संपतात तेव्हा गट्टयाची भाजी हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो.

चला तर जाणून घेऊ या कशी करावी ही गट्टयाची भाजी..

साहित्य:

● दोन कप बेसन

● एक चमचा जिरं

● दोन चमचे लाल तिखट

● एक चमचा हळद

● एक चमचा आमचुर पावडर

● चवीनुसार मीठ

● गरम मसाला

● शेंगदाण्याचे तेल

● आवश्यकतेनुसार पाणी

कृती:

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात दोन कप बेसन पीठ, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि तेल घ्यावे.

नंतर या सर्व साहित्यात थोडसं पाणी मिसळून त्याचे छोटे छोटे गट्टे (गोळे) तयार करावे.

हे तयार बेसणाचे गट्टे 10 मिनिटे गरम पाण्यात उकळून घ्यावे.

नंतर मग जिरे, मीठ, हळद व लाल तिखट पावडर ही सर्व साहित्य एकत्र चांगल मिक्स करावे.

आता एक वेगळी कढई घेऊन त्यामध्ये जिरे, मीठ, हळद आणि लाल तिखट पावडर गरम मसाला घालून मिक्स करावी.

हा मसाला चांगला कलसला की मग त्यात उकडलेले किंवा तळलेले बेसणाचे गट्टे सोडून द्यावे आणि त्याला दहा मिनिटे चांगली उकळी येऊ द्यावी .

चवदार भाजी होण्यासाठी त्यात आमचुर पावडर घालावी आणि 10 ते 20 मिनिटे मिश्रण तसंच राहु द्यावे अशा पद्धतीने आपली चमचमीत गट्ट्याची भाजी तयार झाली आहे.आपण ही गट्टयाची भाजी पोळी, पुरी, नान, कुलचा आणि भातासोबत देखील खाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT