Vidarbha Special Bharli Vangi Masala Esakal
फूड

Recipe: विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला कशी तयार करायची?

कोणालाही साधी सोपी तयार केलेली वाग्यांची भाजी फारशी आवडत नसते.

दिपाली सुसर

वांगी  किंवा वांग्याची भाजी सगळ्याच्या घरात होत असते. कोणालाही साधी सोपी तयार केलेली वाग्यांची भाजी फारशी आवडत नसते. पण तेच जर  भरलेली वांगी असेल तर घरातील लोकं आवडीने ते खातात. चला तर मग जाणून घेऊया, विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला कशी तयार करायची? याची सविस्तर रेसिपी..

साहित्य:

एक पाव मध्यम काटेरी वांगी

मुठभर भाजलेले शेंगदाणे

किसलेले सुके खोबरे

एक चमचा पांढरे तीळ

अर्धा चमचा गोडा मसाला

चार ते पाच लसूण पाकळ्या

एक चमचा आलं पेस्ट

एक चमचा जीरे

कोथिंबीर

एक मोठा कांदा बारीक चिरून

एक टोमॅटो बारीक चिरून

हळद

1 चमचा काश्मिरी लाल तिखट

1 चमचा घरचं लाल तिखट

गूळाचा खडा

मीठ चवीनुसार

शेंगदाणा तेल

एक चमचा बेसन

कृती

कढई मध्ये जीरे,खोबरे भिजून घ्यावे. त्यांनतर त्यात तीळ, लसूण,आलं, कोथिंबीर घालून परतून घ्यावे. हे सगळ मस्त पाच मिनिटे छान भाजून घ्यावे.

ब्लेंडरमधे हे मिश्रण काढून घ्यावे. व त्यात भाजलेले शेंगदाणे घालून पाणी न चालता वाटून घ्यावे. वाटलेले मिश्रण प्लेटमध्ये काढून त्यात कांदा, टोमॅटो,तिळ तिखट,हळद,गोडा मसाला,बेसन मीठ, कोथिंबीर आणि दोन चमचे शेंगदाणे तेल घालून मिक्स करून घ्यावे. या तेलामुळे छान चव येते.

वांग्याचे काटे काढून घ्यावे. चिरा पाडून त्यात हा मसाला भरून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यात हा उरलेला मसाला चांगला भाजून घ्यावा. नंतर त्यात टोमॅटो घालून परतून घ्यावा.

गूळाचा खडा घाला. व तयार वांगी घालून मसाला मिक्स करा. थोडं गरम पाणी घालून मंद आचेवर वांगी 10 ते 15 मिनिटे शिजू द्यावे. गरम पाण्यामुळे रंग छान टिकून राहतो.

गरमागरम वांगी भाकरी सोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT