Ragada Chaat'  Esakal
फूड

Recipe: अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा खाऊ गल्ली मिळतो तसेच ‘रगडा चाट’

खाऊ गल्लीत मिळणारी पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, रगडा चाट या पदार्थांचे नाव जरी घेतले. तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हे पदार्थ तुम्ही स्वताःच्या हाताने घरच्या घरी देखील बनवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

खाऊ गल्लीत मिळणारी पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, रगडा चाट या पदार्थांचे नाव जरी घेतले. तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हे पदार्थ तुम्ही स्वताःच्या हाताने घरच्या घरी देखील बनवू शकता. आजच्या लेखात आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने रगडा चाट कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य:

चार उकडलेले बटाटे

दोन वाटी पांढरे वाटाणे

दोन वाटी घट्ट दही

एक चमचा लाल मिरची पावडर

एक चमचा जीरे पूड

कोथिंबीर

चाट मसाला

अर्धा वाटी शेव

एक चमचा हिरवी चटणी

मीठ चवीनुसार

कृती:

सर्वप्रथम बटाट्याची साल काढून ते स्वच्छ करून घ्या.

त्यानंतर पांढरे वाटाणे स्वच्छ धूवून बटाटे आणि वाटाणे किंचीत मीठ मिक्स करून कुकरमध्ये उकडून घ्या.

आता बटाटे आणि वाटाणे उकडल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या.

आता त्यामध्ये दही आणि हिरवी चटणी टाका आणि लाल तिखट आणि चाट मसाला टाका.

त्यावर मीठ, जीरे पूड, गाजराचा खिस, बीटाचा खीस, शेव आणि कोथिंबीर घालून सजवा.

गरमा गरम रगडा चाट सर्वांना खाऊ घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PoK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तरंजित संघर्ष! निदर्शकांवर गोळीबार, १२० जण ठार झाल्याचा दावा; तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

FIFA World Cup 2026 full Schedule: ४८ संघ, ३९ दिवस अन् १०४ सामन्यांचा थरार रंगणार..! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या सर्वकाही

Dharavi Redevelopment: धारावीचा विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं प्रकल्प कधी पूर्ण होणार?

राज्यसभेच्या २६ जागांसाठी २८ उमेदवार मैदानात, भाजपनं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; दोन-तृतियांश बहुमतासाठी NDAच्या हालचाली

IND vs AFG : हार्दिक पांड्याचा फिटनेस रिपोर्ट आला समोर... वन डे मालिकेत खेळणार की नाही? रोहित शर्माचं काय?

SCROLL FOR NEXT