recipe sakal
फूड

रेसिपी : महालक्ष्मी स्पेशल ज्वारीची आंबील

उभ्या महालक्ष्म्या हा विदर्भातील मोठा सण. या सणाचा थाट लग्नासारखा असतो. सुंदर सजावट केली जाते.

सकाळ वृत्तसेवा

उभ्या महालक्ष्म्या हा विदर्भातील मोठा सण. या सणाचा थाट लग्नासारखा असतो. सुंदर सजावट केली जाते. महालक्ष्म्यांना छान नटविले जाते. स्वयंपाकाचा थाट काय वर्णावा? सोळा भाज्या, सोळा चटण्या, वडा-पुरण. सगळ्यामध्ये मुख्य प्रसाद असतो ज्वारीच्या आंबीलीचा. आज जाणून घेऊया आंबीलीचा रेसिपी.

साहित्य :

  • ४-५ टेबलस्पून ज्वारीचे पीठ

  • ५ टेबलस्पून दही

  • २ टेबलस्पून शेंगदाणे

  • थोडसे खोबऱ्याचे काप

  • ५-६ कढीपत्त्याची पाने

  • १ टिस्पुन मोहरी

  • १ टेबलस्पून तिळ

  • १/२ टीस्पून हिंग

  • २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

  • १ टेबलस्पून तेल

  • चवीनुसार मीठ

  • २ ग्लास पाणी

कृती :

ज्वारीच्या पीठामध्ये पाणी घालून चांगले मिक्स करून रात्रभर भिजवून ठेवावे. दुसऱ्या दिवशी या भिजवलेल्या पिठात घुसळून घेतलेले दही मिक्स करावे. एका पॅनमध्ये तेल घालावे तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यामध्ये हिंग, कढीपत्ता घालावा. हिरवी मिरची शेंगदाणे खोबऱ्याचे काप, तिळ घालून एक मिनिट होऊ द्यावे.

आता यामध्ये दोन ग्लास पाणी घालावे व पाण्याला उकळी आली की गॅस सिम वर करून भिजवून घेतलेले ज्वारीचे पीठ हळूहळू गरम पाण्यात सोडावे. चवीनुसार मीठ घालावे. दोन मिनिटे ही आंबील छान शिजवून घ्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live: महेंद्रसिंग धोनी 'चेपॉक' वर आला, पण खेळणार का? कॅप्टन ऋतुराजने उत्तर दिले... रवी शास्त्रींनी MS म्हणताच जल्लोष अन्...

Latest Marathi News Live Update : शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Devsthan Inam Abolition: देवस्थान इनाम निर्मूलन कायदा मागे घ्या; अष्टविनायक मंदिरांचा एकमुखी इशारा, जमिनींच्या सुरक्षेसाठी संयुक्त लढ्याची घोषणा

Pune Bar Attack: सागर रेस्टॉरंटमध्ये डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या; चौघांविरोधात गुन्हा दाखल

Baramati Civic Body : आचारसंहितेच्या सावटाखाली बारामती नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा तहकूब; ७७ महत्त्वाचे विषय रखडले

SCROLL FOR NEXT