the recipe of rasgulla homemade within less time in kolhapur
the recipe of rasgulla homemade within less time in kolhapur 
फूड

जाणून घ्या घरीच रसगुल्ले बनवण्याची सोपी पद्धत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : रसगुल्ला ही एक गोड मिठाई आहे. ज्याच्या नावातच रस सामील आहे. परंतु इथे रसचा अर्थ ज्यूस आणि गुल्लाचा अर्थ छोटे छोटे गोळे असा होतो. रसात भिजवलेले गोळ म्हणजे रसगुल्ला.

मुख्य सामग्री -

1/2 लीटर थंड दूध
1 कप साखर
2 कप पाणी
आवश्यकतेनुसार लिंबूचा रस
1 छोटा चमचा मक्याचे पीठ 


कृती - 

सुरुवातीला एक मोठा बाउल घ्या. त्यामध्ये दूध टाका. गरम ते करण्यासाठी ठेवा. दुधाला तोपर्यंत उकळु द्या. उकळ्यानंतर आता याच लिंबूचा रस पिळा. लिंबू पिळल्यानंतर ते दूध फुटेल. जर तुमच्याकडे लिंबूचा रस नसेल तरी यासाठी तुम्ही सिरका सुद्धा वापरू शकता. सिरकाच्या मदतीनेही दूध फुटते.

जेव्हा दूध फुटेल तेव्हा त्याला दोन-तीन मिनीट शिजवून घ्या. त्यातील पाणी काढून, त्याचे पनीर बनवून घ्या. आता यामध्ये थोडे पाणी घाला. यामुळे पनीरच्या सिरका असलेला तो आंबटपणा पूर्णपणे निघून जाईल.

आता हे पनीर एका कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवा. दहा पंधरा मिनिटे ते बांधून ठेवा. त्यामुळे यामध्ये असलेलं पाणी निघून जाईल.

एक कढई घ्या. त्यात दोन कप पाणी घ्या. त्यामध्ये साखर घालून पाणी चमच्याने हलवत राहा. आता या पाण्याला चार ते पाच मिनिटे उकळवा आणि साखर घालून त्याचा गोड सिरप बनवून घ्या.

आता वेळ आहे पनीरची. ते पनीर कॉटनच्या कपड्यातून वेगळे करा. त्यात थोडसं कॉर्नफ्लॉवर घाला. त्याचे सॉफ्ट मिश्रण एकत्र करा, ते मळा.  सॉफ्ट तयार झालेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवा. या तयार गोळ्यांना त्या शुगर सिरपमध्ये सोडा.

रसगुल्ले साखरेच्या सिरपमध्ये किमान दहा ते पंधरा मिनीट शिजवून घ्या. तोपर्यंत तुम्हाला शिजवायचे जोपर्यंत रसगुल्ल्याची आकार मोठा होत नाही. जेव्हा हे उत्तम प्रकारे शिजेल त्यावेळी त्याचा आकार मोठा होईल आणि पूर्णपणे साखरेचे पाणी त्यात मुरेले. तुमचा पांढराशुभ्र रसगुल्ला तयार होईल. खाण्यासाठी खूप स्वादिष्ट असलेले रसगुल्ले तुम्ही गरम किंवा थंड करून करू शकता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT